वाल्मिकी कराडला पुण्यामधून अटक:
बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेला वाल्मीक कराड या मुख्य आरोपीला पुणे येथून सीआयडी अधिकाऱ्यांना अटक करण्यात यश आले आहे. वाल्मिकी कराडने अटके पूर्वी सोशल मीडिया वरती संपूर्ण स्टोरी सांगत सीआयडीला शरण आला आणि सरेंडर केले. सरेंडर केल्यानंतर तेथून त्याला लगेच केज ला हलवण्यात आले. केज ला हलवल्यानंतर लगेच त्याची जिल्हा रुग्णालयामध्ये चाचणी करण्यात आली. आणि तेथून केजच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण :
डिसेंबर महिना हा संपूर्ण महाराष्ट्रभर मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या झालेल्या निर्गुण हत्या वरच संपून गेला. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे निर्गुण प्रणय हत्या करण्यात आली आणि या हत्यामागे वाल्मिकी कराड आणि सुदर्शन घुले हे दोन आरोपी असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. हत्या झाल्यापासून ते 31 डिसेंबर रोजी वाल्मिकी कराड सिलेंडर होईपर्यंत तब्बल 22 दिवस हे दोघेही फरार होते. अखेर त्याने 31 डिसेंबर 2024 रोजी पुणे येथे पोलिसांसमोर सिलेंडर केले. हे प्रकरण एवढे गाजले होते की हिवाळी अधिवेशन, ते गावोगावी उपोषणे मोर्चे, राज्यातील देशातील मोठमोठे नेते या मोर्चामध्ये आणि उपोषणांमध्ये सहभागी झाले होते. यावरून असे लक्षात येते की हे प्रकरण फक्त या खुनावरतीच थांबणार नसून यामागे अजूनही काही फार मोठ्या गोष्टी दडलेले आहेत.
संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या केल्या असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. आणि या सर्व घटनेमागचा मास्टरमाइंड हा वाल्मिकी कराड आहे असे सांगण्यात येत आहे. ज्या वेळेस अपहरण झाले होते त्यावेळेस संतोष देशमुख यांच्या घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती आणि अगदी काही तासातच त्यांचा मृतदेह आढळला.
संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली :
तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवनचक्की प्रकल्प हे मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत. हेच प्रकल्प बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये तयार होताना दिसत आहेत. तरी याच पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणी मागितल्या प्रकरणी संतोष देशमुख यांच्या हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मसाजोग या गावाच्या भागांमध्ये अवधा या कंपनीचा पवनचक्की प्रकल्प उभारत आहे. याच गावामध्ये अर्धा कंपनीचे ऑफिस देखील आहे. त्याच ऑफिसमध्ये आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी कंपनीकडून खंडणी मागण्यासाठी आलेले होते. तेथेच सोनवणे हातरून जो की मसाजोग चा रहिवासी होता याच्यासोबत त्या ऑफिसमध्ये तक्रारी झाल्या आणि तक्रारिंचे चे रूपांतर भांडणांमध्ये झाले. अवधा या कंपनीला पवनचक्की चा प्रकल्प उभारण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी जागा मिळवून दिली होती.
टाकळी गावचे तरुण आणि मस्साजोग गावच्या तरुणांमध्ये तिथे राडा झाला. खंडणी मागितल्या प्रकरणी टाकळी गावच्या तरुणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आली. त्यांना काही वेळानंतर जामीन करण्यात आला. सर्व प्रकरणांमध्ये संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येत आहे. याच मध्यस्थी केलेल्याच्या रागावरून त्यांचा खून झाल्याचे त्यांच्या घरच्यांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची सुरुवात झाली ती अवधा प्रकल्प कंपनी च्या प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी नोंदवलेल्या एफ आय आर पासून.
सुनील शिंदे यांनी एफ आय आर मध्ये सांगितले की, मी सुनील शिंदे मागच्या एक वर्षापासून आवाजा या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजरच्या पदावर काम करत असून, माझ्याकडून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील अनेक ठिकाणी पवनचक्की प्रकल्पांची मांडणी आणि उभारणी करण्यात आले आहे. माझे सहकारी शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहणाचे काम पाहतात. नेमके 29 नोव्हेंबर 2024 सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मी मस्सा जोग येथील प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना विष्णू चाटे यांचा फोन आला आणि वाल्मिकी अण्णा बोलणार आहेत असे सांगण्यात आले, अरे ते काम बंद करा, या परिस्थितीमध्ये सुदर्शन ने सांगितले आहे त्या पद्धतीने काम बंद करा. काम चालू केले तर याद राखा अशा प्रकारची धमकी देऊन कॉल कट केला.
मी आणि शिवाजी थोपटे कार्यालयात उपस्थित असताना दुपारी 2:30 च्या सुमारास सुदर्शन घुले राहणार टाकळी हा आमच्या मसाज योग येथील कार्यालयामध्ये आला आणि काम बंद करा, अन्यथा यापूर्वीची मागणी केली आहे त्याची पूर्तता करा. असं म्हणून केज मध्ये इतर ठिकाणी चालू असलेलं अवधा कंपनीचे प्रकल्प सर्व प्रकल्प बंद करा नाहीतर तुमच्या हातपाय तोडून तुमची वाट लावीन असं म्हणून धमकी दिली होती. काही दिवसांपूर्वी वाल्मिकी अण्णा कराड यांनी शिवाजी थोपटे यांना परळी येथील त्यांच्या कार्यालयात बोलून तुमच्या कंपनीच्या सर्व काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये आणून द्या सांगण्यात आले होते. त्यानंतर सारखेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या फोनवरून काम बंद करा अन्यथा परिणाम वाईट होईल अशा प्रकारच्या धमक्या येत होत्या.
अशाप्रकारे संतोष देशमुख यांच्या हत्या होण्यामागे अशी सुरुवात झाली होती आणि यामधूनच हत्या सारख्या मोठ्या भांडणाची ठिणगी तयार झाली होती.