वेळ अमावस्या :
आपण सर्व शेतकरी बंधू वर्षातून एक दिवस हा शेतामध्ये पूजा विधी करून नैवेद्य दाखवून झाडाखाली बसून जेवण करतो. तो दिवस म्हणजे वेळामावस्येचा दिवस. नोकरीसाठी किंवा काही कामासाठी तुम्ही कुठेही राहत असला तरी खास वेळामावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या शेतामध्ये येऊन जेवण करतात. तुम्हाला माहित आहे का वेळा मस्त या दिवसाचे नेमका महत्त्व काय आहे. तर सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि याच सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण सर्वजण वेळ अमावस्या म्हणून ती शेतामध्ये साजरी करतो. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस हा महाराष्ट्र मध्ये वेळ अमावस्या दिवस म्हणून साजरा केला जातो.
वेळ अमावस्येच्या दिवशी काय काय केले जाते :
तर प्रमुख था महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर वरचे शेतकरी आपापल्या शेतामध्ये वेळामावस्या हा दिवस अगदी थाटात साजरा करतात. या दिवसाचे विशेष असं महत्त्व म्हणजे शेतात असलेले सर्व शेत दैवत आणि आपली काळी आई ला नैवेद्य दाखवला जातो आणि तिची पूजाही केली जाते. त्यानंतर वेळ आमच्या या दिवसासाठी खास असे भोजन मेजवानी बनवली जाते विविध प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी, शेंगदाणे, पोळी, ताक अशा प्रकारचे अनेक खाद्यपदार्थ बनवून त्याचा आस्वाद सर्व कुटुंब मिळून आपल्या शेतामध्ये घेतात.
वेळ अमावस्या मागचे ज्योतिष शास्त्र :
2024 च्या 30 डिसेंबर रोजी येणारी वेळ अमावस्या आहे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. 30 डिसेंबर रोजी असणाऱ्या वेळा दिवशी खूप मोठा योगायोग घडून आलेला आहे. हे अमावस्या अगदी मूळ नक्षत्रावरती आलेले आहे. आता मूळ नक्षत्र म्हणजे काय तर हे दुसरं काही नसून हे केतूच नक्षत्र आहे. केतू या ग्रहाला धर्माची ध्वजा फडकवणारा ग्रह देखील म्हणून ओळखले जाते. या दिवशी की तुझी अश्विनी नक्षत्र, मघा नक्षत्र आणि मूळ नक्षत्र हे तिन्ही नक्षत्र सूर्याच्या प्रभावाखाली येतात. या दिवशी शस्त्र प्रमाणे पूजा विधी केल्यास तुम्हाला फार पुण्य लाभेल.
वेळा अमावस्या कशी साजरी केली जाते :
प्रथमता 12 फळे असलेली जी की निसर्गातून उपलब्ध होतात त्यांची भाजी केली जाते. पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, शेतातील गावातील सर्व देवी देवतांसाठी नैवेद्य बनवला जातो, प्रामुख्याने खीर देखील बनवले जाते, ह्या अशा सर्व गोष्टी घरी बनवून शेतामध्ये घेऊन जाऊन तेथे पाच पांडवांची एका झाडाखाली पूजा केली जाते त्याला नैवेद्य, अक्षदा वाहला जातो. त्यानंतर तिथे एक दिवा लावून त्यासोबतच एक मातीचे मडके देखील त्यावरती रंगरंगोटी चे काम करून त्यामध्ये थोडासा नैवेद्य ठेवून त्याची देखील पूजा केली जाते. हे सर्व झाल्यानंतर विहिरी काठी एक नैवेद्य ठेवून पूजा केली जाते. त्यानंतर शेतातील देवता यांना नारळ फोडून नैवेद्य दावून त्यांची देखील पूजा केली जाते.
शेवटी मग वेळ येते ती मस्त सर्व कुटुंबांसोबत मोकळ्या नैसर्गिक वातावरणामध्ये घरून बनवून आणलेल्या मेजवानीचा आनंद लुटण्याची. हे सर्व दिवसभर चालतं त्यानंतर सायंकाळ होताच सर्व काही सामान गोळा करून शेतकरी आपल्या घराच्या दिशेने निघतो. आणि असा हा वेळामावस्येच्या दिवसाचा शेतकरी कुटुंबाचा दिनक्रम असतो जो की अगदी आनंदात आणि उत्साहात जातो. वेळामावस्या या दिवसाला शेतकऱ्याच्या आयुष्यात एक वेगळेच स्थान आहे. जसा शेतकरी बैलांचा सण बैलपोळा हा अगदी थाटात साजरा करतो तशाच प्रकारे आपली शेती आपल्या काळ्या जी की मातीतून आपल्या उदरनिर्वाह होण्यासाठी पीक पिकवते त्या आईचा नैवेद्य दाखवून पूजा करण्याचा दिवस वेळ अमावस्या हा दिवस देखील तितक्याच थाटात आणि उत्साहात साजरा करतो.
वेळ अमावस्या हा दिवस रब्बी पिकाच्या म्हणजेच ज्वारी गहू यांच्या मध्ये दाने भरतानाच्या दिवसांमध्येच येतो. त्यामुळे दिवसभर शेतामध्ये वेळामावस्या साजरी केल्यानंतर शेतकरी आपल्या डोक्यावरती घेता यावा असं काही ज्वारीचे ताट काढून त्याला व्यवस्थित असे मध्यभागी एक टोपलं ठेवून त्यामध्ये एक दिवा लावून ते डोक्यावर घेऊन रात्रीच्या वेळी संपूर्ण गावभर फेरी मारून वेशी मध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये ठेवतो. यासोबत हर हर महादेव चा गजर देखील केला जातो. अशी ही शेतकऱ्याच्या आयुष्यातली वर्षातून एकदाच येणारे आपल्या काळी आईचं एक प्रकारे रूम फेडणारे आणि तिची जाण ठेवणारी वेळा अमावस्या हा सण साजरा केला जातो.
असं म्हणतात ना की माणूस किती जरी उंचीवर ते गेला तरी ज्या ज्या मातीमध्ये तो पाय रोवून एवढ्या उंची वरती गेला आहे त्या मातीला तो कधीही विसरत नाही तशाच प्रकारे कोणी कितीही माती पासून लांब गेला तरी या दिवशी आपल्या सहकुटुंबासोबत वेळ अमावस्येचा दिवस हा आपल्या शेतामध्ये साजरा केलाच पाहिजे.