---Advertisement---

विरुद्ध आहार: 7 चुकीच्या आहार संयोजनाचे दुष्परिणाम आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
विरुद्ध आहार
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

विरुद्ध आहार

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण खाण्यापिण्याकडे खूपच दुर्लक्ष करतो. अन्न ही केवळ पोट भरण्याची गोष्ट नसून, ते शरीर, मन आणि आरोग्य यांचा मूळ आधार आहे. आयुर्वेदामध्ये काही पदार्थ एकत्र खाल्ले तर ते शरीराला हानिकारक ठरतात, यांना विरुद्ध आहार असे म्हटले जाते.

विरुद्ध आहार म्हणजे असे अन्नपदार्थ जे एकत्र घेतल्यास त्यांच्या गुणधर्मांमध्ये संघर्ष होतो आणि त्यामुळे शरीरात विषारी परिणाम निर्माण होतात. हे अपचन, त्वचाविकार, अ‍ॅसिडिटी, अग्नी मंद होणे, वायु विकार, इत्यादी समस्या निर्माण करू शकतात. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे विरुद्ध आहार आणि त्यामागील वैज्ञानिक व आयुर्वेदिक कारणे.

१. दूध आणि फणस कधीही एकत्र खाऊ नये

फणस हा उष्ण प्रकृतीचा फल आहे, तर दूध थंड गुणधर्माचे. जेव्हा हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतले जातात, तेव्हा शरीरात रसधातूवर विपरीत परिणाम होतो. हे एकत्र घेतल्याने त्वचा विकार, अपचन किंवा पोट फुगणे यासारख्या त्रासांची शक्यता असते.

आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज

२. दूध आणि कुलथी एकत्र घेणे टाळावे

कुलथी हे उष्ण व रुक्ष गुणाचे धान्य आहे, तर दूध हे स्निग्ध आणि थंड आहे. हे दोन्ही एकत्र घेतल्याने पचनसंस्था असंतुलित होते. विशेषतः त्वचारोग व सांधेदुखी असलेल्या व्यक्तींनी हे संयोजन टाळावे.

३. विरुद्ध आहार: मीठ आणि दूध, अंबट पदार्थ, मासे यांचे एकत्र सेवन करू नये

मीठ हे शरीरात पित्त वाढवते आणि दूध पित्त शांत करते. त्यामुळे या दोघांचा एकत्र उपयोग शरीरात दोषवृद्धी करतो. दूध आणि मासे एकत्र खाल्ल्यास त्वचारोग, अ‍ॅलर्जी व बद्धकोष्ठतेची तक्रार उद्भवू शकते. आंबट पदार्थ जसे की दही, लिंबू, लोणचं यासोबत दूध घेणे टाळावे.

४. विरुद्ध आहार: दही गरम करून खाणे आरोग्यास घातक

दही गरम केल्यावर त्याचे गुणधर्म बदलतात. ते पचायला कठीण होते आणि विषारी घटक तयार होतात. त्यामुळे गरम दही टाळावे. पण दही पातळ करून ताक स्वरूपात घेतल्यास ते चालते. दही कधीही शिजवू नये.

५. विरुद्ध आहार: मध आणि तूप समान प्रमाणात घेणे टाळा

आयुर्वेदानुसार मध आणि तूप हे वेगवेगळ्या गुणधर्माचे आहेत. हे दोन्ही समान प्रमाणात एकत्र घेतल्यास त्यातून विष निर्माण होते. त्यामुळे या दोघांचा वापर असमान प्रमाणात किंवा स्वतंत्रपणे करावा.

६. विरुद्ध आहार: जवाचे पीठ दुसऱ्या धान्याशी न मिसळता घ्यावे

जव हे रुक्ष व पचायला कठीण धान्य आहे. हे दुसऱ्या धान्यांसोबत मिसळल्यास पचनसंस्था त्रासते. विशेषतः ज्या लोकांना पचन कमी आहे त्यांनी ही काळजी घ्यावी. म्हणूनच, जवाचे पीठ स्वतंत्रपणे वापरणे शारीरिक दृष्टिकोनातून योग्य आहे.

७. विरुद्ध आहार: सुपारीचे पान काही परिस्थितीत खाऊ नये

शौचास गेल्यानंतर, जेवणाआधी किंवा सर्दी, खोकला, पांडुरोग, दातात पू आलेला असताना किंवा घाम येत असताना सुपारीचे पान खाल्ल्यास शरीरावर उलट परिणाम होतो. यामुळे शरीरात विष निर्माण होते आणि त्रास वाढतो.

विरुद्ध आहार

विरुद्ध आहार टाळण्याचे फायदे

  1. पचन सुधारते – विरुद्ध पदार्थ न खाल्ल्यास शरीरात त्रिदोषांचा समतोल राहतो.
  2. त्वचा विकार टाळले जातात – शरीरात विष निर्माण होत नाही.
  3. शरीरात उर्जा टिकते – अपचनामुळे निर्माण होणारी सुस्ती व कमजोरी टाळता येते.
  4. मनःस्वास्थ्य टिकते – पचन व्यवस्थित झाल्याने मेंदूही शांत राहतो.

विरुद्ध आहार संबंधित आयुर्वेदिक शास्त्र

आयुर्वेदानुसार, ‘समान गुणांचे पदार्थ’ एकत्र घ्यावेत. विरुद्ध गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र केल्यास “आम” निर्माण होते. “आम” म्हणजेच पचलेले अन्नाचे अवशेष, जे शरीरात विषसदृश्य स्वरूपात फिरतात आणि रोग निर्माण करतात.

National Health Portalhttps://www.india.gov.in/national-health-portal?page=1

आधुनिक विज्ञान काय सांगते?

आज अनेक अभ्यासांमध्ये स्पष्ट झाले आहे की, विरुद्ध पदार्थांचे संयोजन केल्यावर शरीरात इंफ्लेमेशन, अ‍ॅलर्जी, फूड इंटोलरन्स यासारखे विकार निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, दूध आणि मासे यामधील प्रोटिन्स एकत्र येऊन शरीरात प्रोटिनचा चुकीचा प्रकार तयार करतात जो शरीराला नुकसान पोहचवत.

विरुद्ध आहार ही फक्त एक परंपरागत समजूत नाही, तर त्यामागे स्पष्ट आरोग्यशास्त्रीय व वैज्ञानिक कारणे आहेत. म्हणून आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये योग्य संयोजन ठेवावे आणि विरुद्ध आहार संयोजन कटाक्षाने टाळावे.

आपले अन्न हेच आपले औषध आहे, हे लक्षात ठेवून अन्नाची निवड करावी. आयुर्वेदाच्या या तत्वांना समजून घेतल्यास आपण निरोगी जीवनाकडे एक पाऊल पुढे टाकू शकतो.अशा प्रकारचे विरुद्ध आहार शक्यतो आपल्यावर दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जेवणामध्ये टाळावेत आणि त्याचबरोबर शक्य असेल तेवढे घरी बनवलेले अन्नपदार्थ जेवणामध्ये आणावेत यामुळे देखील शरीरावरील होणाऱ्या हानिकारक परिणाम बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदत होते. अच्छा भेसळयुक्त जगामध्ये बाहेर मिळणारे प्रत्येक खाद्यपदार्थ हे कशाप्रकारे बनवले जातात याची आपल्याला कसलीही पारदर्शकता नसते त्यामुळे शक्यतो होता होईल तेवढे बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे आणि आपले स्वास्थ्य सुदृढ ठेवावे.

10 WELLNESS HEALTHY TIPS

---Advertisement---

Leave a Comment