लाडक्या बहिणीसाठी सोलर चूल :-
महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणीसाठी राज्यातील राज्य सरकारकडून एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी ” मोफत सोलार चूल योजना” योजना सुरू करण्यात आलेली आहे. तरी या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना अगदी मोफत पणे सौर उर्जेवरती म्हणजेच सूर्याच्या प्रकाशावरती चालणाऱ्या चुली मोफत दिल्या जाणार आहेत. यात सौरचुलीमुळे लाडक्या बहिणींना आपल्या दैनंदिन जीवनासाठी दररोजचा स्वयंपाक करताना खूप सोयीचा आणि सुखकर होणार आहे. लाडक्या बहिणींच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकारने मोफत सौरचुली वाटण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पाहूया या पोस्टच्या माध्यमातून काय आहे लाडकी बहीण मोफत सोलार चुली योजना.
कशी असेल सोलार चुल :-

तरी या सोलार चुलीचे स्वरूप असे असणार आहे की, यामध्ये तुम्हाला एक शेगडी दिले जाणार आणि त्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत म्हणून असलेले पीव्ही पॅनल हे तुम्हाला तुमच्या छतावरती लावावे लागणार आहे. जेणेकरून सूर्यप्रकाश थेट त्या पिविकारावरती पडेल आणि त्यातून होणाऱ्या उर्जेवरती शेगडी वरती तुम्ही तुमचा स्वयंपाक करू शकणार आहात. इंडियन ऑइल या कंपनीने बनवलेल्या इंडॉर कुकिंग सोलर सिस्टिम ही या योजनेमार्फत देण्यात येणार आहे. तरीही इंडोअर सोलार कुकिंग साठीची सोलर चूल तुम्हाला मिळवण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा लागणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं या सोलर चुलीवर ती तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे जेवण बनवू शकता ते पाहूया.
सोलर चुलीवरती कोणकोणत्या प्रकारचे जेवण बनवू शकता :-
- तर तुम्ही या सोलर चुलीवरती भारतीय पद्धतीचे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ बनवू शकता.
- तसेच तुम्ही या सोलार चुली वरती डाळ, चपाती, सर्व प्रकारच्या भाज्या, अंडी उकडू शकता आणि आपण जो दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या वापरामध्ये स्वयंपाक बनवतो तो सर्व पद्धतीचा स्वयंपाक यावरती बनवू शकता.
- या सोलापूर ते तुम्ही इडली, डोसा,उत्तप्पा,पोहे अशा प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ देखील बनवू शकता.
तर अशाप्रकारे वरी दिल्याप्रमाणे सोलार चुलीच्या मदतीने तुम्ही भारतीय आणि महाराष्ट्रीय दैनंदिन जीवनात असलेले सर्व काही खाद्यपदार्थ अगदी सहजरित्या या सोलार चुलीच्या माध्यमातून तुम्ही बनवू शकता.
सोलर चूल वापरण्याचे फायदे आणि तोटे:=
सोलर चुलीचे फायदे (positive points) | सोलर चुलीचे तोटे (negative points) |
तर सोलार चूल वापरल्यामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा होणार म्हणजे तुमचा जो गॅस सिलेंडर साठी महिन्याचा खर्च आहे तो पूर्णपणे असणार आहे. | सुरुवातीला तुम्हाला सोलर चुलीचा सेटअप करण्यासाठी थोडासा खर्च येऊ शकतो. |
तुम्ही जर का चुलीवरचे स्वयंपाक करत असेल तर त्यासाठी तुम्ही लाकूड जाळल्याने जो काही दोन निर्माण होतो आणि त्यामुळे होणारा त्रास या सोलर चुलीमुळे नाहीसा होणार आहे. | पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा ढगाळ वातावरणामध्ये सूर्यप्रकाश कमी असल्याकारणाने सोलापूर जाऊ शकते. |
सोलर चुलीवरती तुम्ही सर्व प्रकारचे अन्नपदार्थ बनवू शकतात. | सोलर चुलीवर स्वयंपाक करताना तुम्ही फक्त दिवसभर प्रकाश असतानाच स्वयंपाक करू शकतो रात्री या स्वयंपाक करणे शक्य नाही. |
जर का तुम्ही इलेक्ट्रिक शेगडी वापरत असाल तर सोलर चुलीमुळे तुमची इलेक्ट्रिसिटी बिल वाचण्यास मदत होणार आहे. | सोलर चुलीमध्ये काही बिघाड झाल्यास त्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी थोडाफार खर्च येऊ शकतो. |
तर अशाप्रकारे वरील काही खूप अत्यंत फायदेशीर असेल सोनारचुलीचे फायदे आहेत. आणि ही सोलर सोलापूरचे तोटे त्यामधील सर्वात महत्त्वाचा एकच तोटा आहे की संध्याकाळी सूर्यप्रकाश नसताना यावरती स्वयंपाक करू शकणार नाही. त्यामुळे सांगायचं झालं तर सोलार चूल घेणे हे खूप फायदेशीर ठरणार आहे.
मोफत सोलार चूल योजनेसाठी अर्ज कसा करावा :-
पण लाडक्या वहिनी साठी मोफत सोलर चूल या योजनेमार्फत सोलार चुली मोफत देण्यात येणार असून, यासाठी तुम्हाला ऑनलाईन रित्या अर्ज सादर करावा लागणार आहे. तो अर्ज कसा करावा लागणार आहे ते पाहूया,
- सोलार योजनेसाठी तुम्ही इंडियन ऑइलच्या https://iocl.com/इनडोअरसोलारकूकिंगसिस्टिम या दिलेल्या लिंक वरती क्लिक करून थेट रजिस्ट्रेशन पेज वरती जाऊ शकता.
- या लिंक मधून तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन पेज समोर येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव ई-मेल आयडी तुमचं राज्य तुमच्या कुटुंब संख्या अशा पद्धतीची जी काय माहिती ते विचारले असेल ते तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी भरायचे आहे.
- तुम्ही वर्षभरात किती LPG सिलेंडर वापरता याची पण माहिती द्यावी लागणार आहे.
- तसेच तुम्हाला सोलर चुलीवर किती “बर्नर” पाहिजे आहेत ते पण तुम्हाला तिथे सांगावे लागेल.
- यासोबतच तुम्हाला सोलर कुकर ची आवश्यकता आहे का असेल तर किती तेही तुम्हाला तिथे सांगावे लागणार आहे.
- सर्वात शेवटी तुम्हाला या वरील दिलेल्या फॉर्म संबंधित काही अडचण आहे का तो हे ऑप्शन तिथे दिलेला आहे.
अशा प्रकारे वरील दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोफत सोलापूर या योजनेसाठी अर्ज करू शकता. अत्यंत कमी रकमेमध्ये सोलार चूल हे मिळवू शकता.