आत्ता राज्यामध्ये कार्यरत असलेले महायुती चे सरकार याने सुरू केलेल्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये काही निकष निश्चित केले आहेत. या निकषांच्या आधारे बऱ्याच लाडक्या बहिणींना या निकषांचा फटका बसणार आहे. महायुती सरकारने काल घेतलेल्या मंत्रिमंडळ आढाव बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये खूप महत्त्वाचे आणि मोठे बदल केले. खरंतर महायुती सरकारने सत्तेत अगोदर काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्र घरामध्ये सुरू केली होती. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना दरमहा पंधराशे रुपये देऊन त्यांचा उदरनिर्वाह भागावा या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे काही हप्ते देखील निवडणुकीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले.
निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने प्रचारादरम्यान लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता पंधराशे रुपये वरून 2100 रुपये करणार अशी हमी दिली होती. परंतु त्या संदर्भात सध्या तरी कसलीही चर्चा झाली नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याच्या हप्ते हे पंधराशे रुपये याप्रमाणे झालेले आहेत. म्हणजे सध्या तरी सरकारकडून निवडणुकी अगोदर दिलेल्या आश्वासनावर अंमलबजावणी झालेली दिसत नाही. आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. हे निकषाचे आहेत की या निकषांच्या आधारे लाखो महिला या योजनेमधून बाहेर होऊ शकतात. तर चला पाहूया ते काय काय निकष आहेत.
अधिकृत वेबसाईटवर https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडकी बहीण योजनेतील काय काय निकष बदललेत
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले.
- पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक लाभार्थी वगळता इतर सर्व लाभार्थ्यांना पुन्हा एकदा अर्ज पडताळणीला सामोरे जावे लागणार आहे.
- आतापर्यंत जमा झालेल्या हप्त्यांमध्ये असे आढळून आले आहे की काही लाभार्थी महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना तरी देखील त्यांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेतला आहे. तर अशा अर्जांची छाननी होऊन त्यांची योजना बंद होऊ शकते.
- आंतरराज्य विवाह केलेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- तसेच ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला देखील या योजनेतून बाहेर पडणार आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या लाभार्थी महिलांचे आधार कार्ड वरील नाव आणि बँक खात्यातील नाव यामध्ये साम्य आढळत नसल्यास त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जर एखाद्या अर्जाबाबत तक्रार दिली तर त्या तक्रारीचे अनुसरण करून पुन्हा एकदा अर्ज पडताळणी केली जाईल आणि त्यातून काही दोष आढळल्यास तात्काळ त्या योजनेचा लाभ बंद करण्यात येईल.
- इतर शासकीय लाभ घेणाऱ्या महिलांना लाडके बहिणी योजनेच्या आणि शासकीय लाभ मिळणाऱ्या रकमेचा फरक काढून त्याप्रमाणे हिस्सा मिळणार आहे.
- महिलांचे पॅन कार्ड च्या आधारे त्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे का याची देखील पडताळणी करून लाडकी बहीण योजनेमध्ये ती बसतात का हे पाहिले जाणार आहे.
- लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये कोणालाही सरकारी नोकरी असल्यास त्या महिलेचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होणार आहे.
- एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला जर का लाभार्थी असतील तर फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजना हप्ता 1500 वरून 2100 रुपये पर्यंत करण्याबाबत :
तर सरकारने दिलेल्या श्वासनानुसार माझी लाडकी बहीण योजनेचा रुपये पंधराशे वरून 2100 रुपये रक्कम वाढवण्यावर सरकारने घेतलेल्या बैठकीमध्ये काय महत्त्वाचा निर्णय झाला याबद्दल आदित्य तटकरे काय म्हणाल्या,
” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नवीन अर्थसंकल्प किंवा रकमेची वाढ याबाबतचा निर्णय इतर कुठल्याही दिवशी होऊ शकत नाही. मी जेव्हा ही योजना अंमलात आणली त्यावेळी ही योजना अर्थसंकल्पात आणली होती आणि तिथून ती योजना सुरू झाली होती. आता यानंतर जो काही अर्थसंकल्प होईल त्यामध्ये या योजनेचा अर्थसंकल्प तयार केला जाईल आणि त्यावर सकारात्मक चर्चा केली जाईल आणि तशा पद्धतीचा निर्णयही घेतला जाईल.”
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचे काही निर्णय घेण्यात आले आणि लाडकी बहीण योजनेच्या रकमेतील वाढीबाबत आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. तर या योजनेचा आतापर्यंत लाभ घेऊन शकलेल्या महिलांना आता अर्ज करणे शक्य नसणार आहे. कारण या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी हा ऑक्टोबर मध्ये संपलेला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला आणि सरकारने बनवलेल्या निकषांच्या आधारे इथून पुढे लाभार्थी महिलांना रकमेच्या लाभ घेता येणार आहे.