मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024:
भाजप आणि मित्र पक्षाला महाराष्ट्रामध्ये एकहाती सत्ता मिळवता आली ती म्हणजे या लाडकी बहिण योजनेच्या जीवावर. निवडणुकांच्या पूर्वी बरोबर निवडणुकांचे औचित्य साधुन भाजप सरकार ने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करून त्याची अंमलबजावणी केली. निवडणुकीपूर्वीच महराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्या योजनेचे २ हप्ते पण ताबडतोप देण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा भाजप सरकारला बहुमत देऊन सत्तेत येण्याची संधी दिली. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेत्यांकडून देखील लडकी बहीण योजनेमध्ये हप्ता वाढवून देण्याबाबतची घोषणा त्यांनी त्यांच्या निवडणूक परिपत्रकामध्ये नमूद केलेली होती परंतु राज्यांमध्ये अगोदरच कार्यरत असलेल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांच्या खात्यामध्ये पैसे दिलेल्या वेळेमध्ये जमा केल्यामुळे राज्यांमधील महिलांचा विश्वास हा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या सरकारकडे वळला गेला.
भाजप सरकार ने निवडणुकीआधी लाडकी बहिण योजना मधे १५०० रुपये प्रतीमहा पैसे थेट अकाउंट मधे पाठवत होते ते हि dbt portal च्या माध्यमातून. त्याच योजनेची प्रतिमहा १५०० रुपये वरून २१०० रुपये मर्यादा वाढवण्याचे आश्वासन हे भाजप सरकारने त्यांच्या आश्वासन पत्रामध्ये दिले होते . मग आता त्यावर लवकर उपाययोजना करून २१०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होतात याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहतंय. याबद्दल सध्या तरी राज्य सरकारकडून कसल्याही प्रकारची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाढीबद्दल संध्याकाळी सरकारकडून मौनव्रत पाळण्यात आलेले आहे.
त्यातच आता या लाडकी बहीण योजनेत बरेच काही बदल होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामधे पुन्हा एकदा अर्जाची छाननी प्रक्रिया करून नवीन नियमांमध्ये बदल करून त्यामध्ये ज्या महिला पत्र असतील त्यांनाच २१०० रुपये येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. यावर माझी मंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी ट्विट करून यावर स्पष्टच बोलली. त्या म्हणल्या ” सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया वर म्हणजेच यूट्यूब, फेसबुक, व्हॉटसॲप, इंस्टा वर अनेक फेक व्हिडिओज येत आहेत.
लाडकी बहिण योजना चालू झाल्यापासून ते आत्तापर्यंत जे काही निकष होते त्यामधे कसलेही बदल करण्यात आलेले नाहीत. एक महिला प्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीने लक्ष देऊन आहे . तरी प्रसारमाध्यमांद्वारे होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका”. त्यासोबतच त्यांनी एक परिपत्रकही जारी केलं आहे. त्यात लिहिला आहे की जर काही निकष बदलायचे असतील तर त्याची महिती आम्ही अंगणवाडी सेविकांव्दारे सर्वांपर्यंत पोहचवू. याबाबतची माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही अडचणी असतील या योजनेबद्दल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांना जाऊन विचारू शकता.
अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडक्या बहिण योजनेसाठी चे निकष :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या महिला उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आणि ज्यांना आतापर्यंतचे हप्ते मिळालेले आहेत त्या महिला उमेदवारांसाठी खालील निकषांच्या आधारे या योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना पैसे भेटणार आहेत. यासाठी खालील दिलेल्या निकषांमध्ये अर्ज केलेल्या उमेदवाराचे अर्ज आणि दिलेली माहिती तपासली जाणार आहे.
- लाडकी बहिण योजना जी चालू करण्यात आली आहे ती फक्त आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या गरजू महिलांसाठी चालू करण्यात आली आहे.
- या योजनेमार्फत आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची वयोमर्यादा हि २१ ते ६० वय अशी ठेवण्यात आली आहे.
- ज्यांनी अर्ज केलेत त्यांचे आधार हे बँक खात्याशी संलग्न असावे. या दिलेल्या वयोमर्यादेमधीलच अर्जदार महिला उमेदवारांना दीड हजार रुपये दिले जातात.
- या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला घेऊ शकतात.या योजनेचे उद्दिष्ठ हेच आहे कि राज्यातील गरीब गरजवंत महिलांसाठी आर्थिक मदत.
- ज्या महिलांच्या घराचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या वरील निकष द्वारे आत्तापर्यंत सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले आहेत. परंतु यादरम्यान काही लोकांनी सरकारची फसवणूक करत या निकष्यांमध्ये बसत नसतानादेखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर या फसवणुकीला आला घालण्यासाठी सरकारने काही नवीन निकष काढले आहेत.
लाडक्या बहीण योजनेत काय काय बदल केले बदल केलेत :
- या योजनेसाठी एकच कुटुंबातील फक्त दोनच लाभार्थी पात्र असणार आहेत. दोनपेक्षा अधिक एकच कुटुंबातून कोणी लाभ घेतय का याची तपासणी केली जाणार आहे. एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी महिला उमेदवार यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- लाभार्थी कुटुंबातून कोणी इन्कम टॅक्स भरतो का याची तपासणी केली जाणार आहे. भरत असल्यास त्या कुटुंबातील महिला उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जी महिला लाभार्थी आहे तिच्या घरी चारचाकी वाहन आहे का याचीही पडताळणी केली जाणार आहे.
- विधवा आणि निराधार योजनेचा लाभ घेत असताना लाडक्या बहिणीसाठी च्या योजनेचा हि लाभ घेतायेत का हे ही तपासले जाणार आहे. थोडक्यात सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ अर्ज केलेले महिला उमेदवार घेत असल्यास त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
हे वरील निकष तपासून जे कोणी यामध्ये बसत असेल त्यांचे पैसे बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरील दिलेल्या निकषांच्या आधारे अर्ज केलेल्या महिला उमेदवारांचे अर्ज तपासण्यात येऊन ज्यांचे अर्ज आणि अर्जामध्ये दिलेली माहिती वरील दिलेल्या निकषांमध्ये बसत असेल त्याच महिला उमेदवारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल ?
लाडक्या बहिण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार यावर भाजप क्या नेत्यांकडून लवकरच तारीख समोर येईल असा सांगण्यात येतंय. याची नक्की अशी तारीख अजून तरी समोर आली नसून यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत २ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे . परंतु आता जवळपास ३५ लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची चर्चा पसरत आहे . परंतु अश्या प्रकारची काहीही माहिती अजूनतरी सरकारकडून देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यानी पत्रकार परिषद मधे फक्त एवढच म्हणलं की ज्या कोणी महिला या योजनेसाठी पात्र नसतील त्यांचा पुन्हा एकदा विचार करू . तर अशा प्रकारे लाडकी बहिण योजना बाबत ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेऊ नका असाच या सरकार कडून सांगण्यात येतय.
आता भाजप च्या नेत्यांकडून वेगवेगळ्या मागण्या करण्यात येत आहेतं जसं की नितेश राणेंची मागणी आहे की लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या काही मुस्लिम महिला लाभ घेत आहेत त्यांना जर का दोन च्या वरती अपत्य असतील तर त्यांना या योजनेतून बाद करण्यात यावं . त्यानं या योजनेचा लाभ देण्यात येऊ नये . अशी मागणी आमदार नितेश राणेंकडून करण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर किती होकार देतात आणि हि मागणी कशी मान्य करून लागू करतात हे पाहण्यासारख असणार आहे. कारण एखाद्या स्पेसिफिक समाजाला असा वेगळं नियम लागू करता येतोय का हे बघावं लागेल.
त्याचप्रमाणे निवडणुकीचा प्रचार करताना भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षंकडून म्हणजेच महायुतीच्या नेत्यांकडून राज्यभरामध्ये प्रचार करताना जे हवी पत्र देण्यात आले होते जसे की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून तो हप्ता पंधराशे रुपये वरून एकवीशे रुपये करण्यात येईल यावर लागून आहे. सत्तेमध्ये असलेले महायुती सरकार हे प्रचार करताना दिलेल्या आश्वासनावरती कितपत कारवाई करते आणि दिलेले आश्वासन कधीपर्यंत पूर्ण करते हे देखील बघणे गरजेचे आहे. लवकरच घेण्यात येणाऱ्या अधिवेशनामध्ये याबद्दलचा निर्णय होईल अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरत आहेत परंतु या बातम्यांमध्ये प्रत्येकी किती आहे हे कोणालाही माहित नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्या वरती विश्वास ठेवू नका राज्य सरकारकडून जेव्हा याबाबतची गोष्ट करण्यात येईल तेव्हाच या निर्णयावर ते अमरबजावणी होईल.