---Advertisement---

या महिलांच्या खात्यात ५ हजार रुपये झाले जमा

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
या महिलांच्या खात्यात ५ हजार रुपये झाले जमा
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

महिलांच्या खात्यात पाच हजार रुपये

तर नमस्कार मित्रांनो नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिसा राज्यातील महिलांसाठी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी आणि त्यांचा घरगुती खर्च भागवण्यासाठी सुभद्रा योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर सुभद्रा योजनेमध्ये किती रुपयांचा लाभ ओरिसातील महिलांना होणार आहे. त्यासाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत? तसेच या योजनेचा आतापर्यंतचे किती रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे? आणि ही योजना कधीपर्यंत चालू राहणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून घेणार आहोत.

सुभद्रा योजना

तर सुभद्रा योजनाही ओरिसातील महिलांसाठी लागू केलेली असून या योजनेचा लाभ 21 वर्षे वयोगट ते साठ वर्षे वयोगटापर्यंतच्या येणाऱ्या महिला घेऊ शकतात. या योजनेसाठी ज्या ज्या महिलांनी वयोगटाची मर्यादा पाळून अर्ज केलेला आहे त्या त्या महिलांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून थेट दरवर्षी दहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. तसेच ही योजना पाच वर्ष या इतक्या काळासाठी लागू असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की सुभद्रा योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरवर्षी दहा हजार याप्रमाणे पाच वर्षासाठी 50 हजार रुपये इतकी रक्कम केंद्र सरकारकडून त्यांना देण्यात येणार आहे.

सुभद्रा योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दरवर्षी काही ठराविक टप्प्यांमध्ये म्हणजेच काही ठराविक महिन्यांच्या अंतराने दोन टप्प्यांमध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच दरवर्षी ठराविक महिन्यांच्या कालावधीनंतर महिलांच्या खात्यामध्ये पाच हजार पहिल्यांदा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच हजार रुपये देऊन एका वर्षाकाठी दहा हजार रुपये रक्कम इतकी जमा करण्यात येणार आहे. तसेच आत्ताच आलेल्या माहितीनुसार ओडिसातील 20 लाख हून अधिक महिलांना तिसऱ्या टप्प्यातील रक्कम ही 24 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेले आहे. यासाठीची रक्कम आत्तापर्यंत एक हजार कोटींपेक्षा जास्त झालेले आहे.

सुभद्रा योजनेसाठीच्या पात्रतेची अट

  1. या योजनेसाठी प्रथम अट सांगायची झाली तर अर्ज करणाऱ्या उमेदवारी महिन्याचे वय हे 21 वर्षे वयोगट ते 60 वर्ष या वयोमर्यादेमध्ये असायला हवे.
  2. दुसरी अट सांगायची झाली तर सुभद्रा योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार महिला ही रुपये दीड हजार पेक्षा अधिक कोणत्याही सरकारी पेन्शन किंवा इतर योजनेचा लाभ घेणारी नसावी.
  3. जर का एखादी महिला सरकारच्या इतर कोणत्या पेन्शनचा लाभ घेत असेल तर ती महिला सुभद्रा योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
  4. ज्या महिला सरकारी दप्तरांमध्ये सरकारी नोकरीसाठी कार्यरत आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  5. या योजनेचा मुख्य हेतू सांगायचा झाले तर राज्यातील विधवा, गरीब गरजवंत महिला, या महिलांसाठी त्यांच्या उदरनिर्वाह वागण्यासाठी एक मदत म्हणून सरकारकडून देण्यात येणार आहे.

नमस्कार मित्रांनो सरकारने सुभद्रा योजनेअंतर्गत 20 लाखांहून अधिक महिलांना तिसऱ्या टप्प्यातील 5,000 रुपये 24 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले आहेत.ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान हे पैसे देण्यात आले. मुख्यमंत्री मोहन माझी यांनी या योजनेंतर्गत आतापर्यंत 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली.

महिलांना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 80 लाख महिलांना लाभ झाला सुभद्रा योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यातील तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे80 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. डिसेंबरपर्यंत 1 कोटींहून अधिक महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सुभद्रा योजना ही ओडिशातील सर्वात मोठी लोककल्याणकारी योजना आहे. ज्याचा फायदा 1 कोटीहून अधिक माता-भगिनींना होत असल्याचे ओडिशा सरकारने म्हटले आहे.मागील सरकारने सुरू केलेल्या मिशन शक्ती योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज देण्यात आले होते. याउलट महिलांना सुभद्रा योजनेंतर्गत थेट आर्थिक मदत दिली जात आहे. सुंदरगड जिल्ह्यात आतापर्यंत 4.59 लाख महिलांनी सुभद्रा योजनेसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 3.37 लाख महिलांना तिसऱ्या टप्प्यात पहिला हप्ता मिळाला आहे.

सुभद्रा योजनेचे पैसे आले की नाही कसे तपासाल? अधिकृत वेबसाइट https://subhadra.odisha.gov.in/ ला भेट द्या.मुख्यपृष्ठावरील लाभार्थी यादीवर क्लिक करा. जिल्हा, तहसील, ग्रामपंचायत आणि प्रभाग निवडा. तुमचे नाव यादीत असल्यास, तुम्हाला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तुमच्या बँक खात्यात पैसे दिले जातील. सुभद्रा योजनेसाठी अर्ज कसा करावा? या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला subhadra.odisha.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. फॉर्म भरताना सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

तर अशाप्रकारे ओडिसातील महिलांना सुभद्रा योजना या योजनेमार्फत त्यांच्या सक्षमीकरणासाठी दरवर्षी दहा हजार याप्रमाणे पाच वर्षासाठी 50 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे आणि त्याचाच तिसरा हप्ता हा आत्ताच जमा झालेला आहे.

महाराष्ट्र मध्ये पण अशी योजना लागू :

सुभद्रा योजनाही ओडिसा राज्यामध्ये यशस्वीरित्या लागू केल्यानंतर भाजप सरकारचा महाराष्ट्र राज्यांमध्ये देखील अशा प्रकारची योजना सुरू केली आहे. या योजनेला त्यांनी ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” असे नाव दिले असेल या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडून टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या हाती महाराष्ट्र राज्य सरकारकडून या योजनेमार्फत दोन हप्ते देण्यात आलेले आहेत. आगामी येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या भाजप आणि मित्र पक्षाच्या सरकारकडून ह्या माझी लाडकी वाहिनी योजनेमध्ये काही बदल करून या योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या रकमेचा हप्ता हा 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.

या योजनेतील हप्ता वाढीमुळे महाराष्ट्र राज्यातील महिला या भाजप आणि मित्र पक्षांकडे आकर्षित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील गरीब होत करू आणि या आर्थिक दृष्ट्या मागास आहेत अशा कुटुंबातील महिलांना राज्य सरकारकडून दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत. महाराष्ट्र मध्ये माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत आहे. या योजनेसाठी महिलांची वयोमर्यादा वय वर्ष 21 ते वय वर्ष 60 इतके ठेवण्यात आलेले आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सरकारकडून काही अटी आणि शर्तींचे निकष देखील ठेवण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील गरीब होतकरू महिला तसेच विधवा महिला ज्यांना घर खर्च भागवण्यासाठी धावपळ करावी लागते अशा महिलांसाठी त्यांच्या घर खर्च भागावा या हेतू कारणाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये सध्या तरी कसलेही प्रकारचे बदल करण्यात आलेले नसून महिलांच्या खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे जमा होत आहेत. या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत त्या महिलांसाठी राज्य सरकारकडून जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा काही ठराविक सरकारी अधिकाऱ्यांकडे जाऊन चौकशी करून तात्काळ त्यांच्या त्रुटी सोडवून घेण्याच्या आदेश महाराष्ट्र राज्य सरकारने देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या महिला उमेदवारांनी अर्ज सादर केलेला नाही त्या महिलांना अर्ज सादर करण्यासाठी जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे आपले कागदपत्रे देऊन आपला फॉर्म भरून घेण्यासाठी च्या सूचना देण्यात आले आहेत.

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि वयोमर्याद्रीचे अट तसेच वार्षिक उत्पन्न म्हणजेच या योजनेसाठी अर्ज भरू इच्छिणाऱ्या महिला उमेदवाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. अजून एक महत्त्वाचे अट म्हणजे अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराचे बँक खाते हे आधारशी संलग्नित असावे तरच या योजनेसाठी अर्ज केलेली उमेदवार पात्र ठरणार आहेत. अशाप्रकारे वरील दिलेल्या अटींमध्ये ज्या महिला उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरतात त्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आता सांगायचं झालं तर ही योजना कधीपर्यंत चालेल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे हेही पाहण्यासारखे आहे की ही योजना कुठपर्यंत चालू शकते

---Advertisement---

Leave a Comment