मुख्यमंत्री निवास वर्षा बंगला मुंबई :
महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या निवासस्थान असणाऱ्या इमारतीला वर्षा हे नाव दिले गेले आणि तिथून पुढे महाराष्ट्र राज्यामधील आत्तापर्यंतच्या निवडले गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी राहूनच त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात राज्याचा कार्यभार सांभाळलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा चर्चेमध्ये येतो तो म्हणजे “वर्षा बंगला”. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला मुंबईमध्ये स्थित असलेला हा वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी दिला जातो. त्यामुळे वर्षा बंगल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळंच स्थान मिळून गेलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर किंवा विधानसभांच्या निवडणुका निकाल लागल्यानंतर एखादा नवीन मुख्यमंत्री निवडला गेला की त्यांचं स्थलांतर लगेच वर्षा बंगल्यामध्ये होतं आणि तिथूनच पुढे महाराष्ट्र राज्यातील कारभाराला सुरुवात होते.

आपणास या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निवासाला वर्षा बंगला हे नाव कोणी दिले? महाराष्ट्रातील कोणताही नवी मुख्यमंत्री आला कि त्याला वर्षा हाच बंगला निवासस्थानासाठी का दिला जातो? काय आहे वर्षा बंगल्याचा इतिहास?
वर्षा बंगला इतिहास :
महाराष्ट्र राज्यातील मंत्री निवासस्थानाला वर्षा बंगला हे नाव पडण्यामागे एक इतिहास आहे. आणि त्या इतिहासाची सुरुवात होते ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्यापासून. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे 5 डिसेंबर 1963 रोजी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. याच दिवसापासून वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. ” शेतकऱ्याला पाणी मिळाले की तो चमत्कार करून दाखवतो ” हा सिद्धांत नेहमी मांडणारे आणि तो सत्यात उतरण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांची ओळख आहे.
20 फेब्रुवारी 1975 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा 19 वर्षांचा प्रदीर्घ काळ वसंतराव नाईक यांचा संपुष्टात आला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थान सोडताना एका कार्यकर्त्यांनी विचारले की साहेब एवढी घाई का करताय कदाचित अजून एकदा निमंत्रण येऊ शकेल. त्यावेळेस वसंतराव नाईक यांनी त्याला सांगितले की, आता ते होणे नाही कोणी आग्रह केला तरी देखील मी माझा बेत बदलणार नाही. प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश करणी यांनी या गोष्टींचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या वसंतराव नाईक यांच्या आत्मचरित्र “दूत पर्जन्य” यामध्ये केला आहे. माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होईपर्यंत वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान कधीच नव्हता.
वसंतराव नाईक आणि वर्षा बंगला इतिहास :-
1963 ते 1975 असा तब्बल19 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील गहुली येथे झाला होता. 1952 मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते पहिल्यांदा पुसद मतदार संघामधून निवडून गेले होते. तेव्हा त्यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये महसूल खात्याचे उपमंत्री झाले होते. महाराष्ट्र राज्य पुनर्रचनेच्या 1956 मध्ये विदर्भाचा समावेश मुंबई प्रांतामध्ये झाला. या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड करण्यात आली होती. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये वसंतराव नाईक यांना मुंबई प्रांतामध्ये कृषिमंत्री हे मंत्रीपद मिळाले होते. त्यावेळी त्यांना मुंबई येथील एका इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून “डक बिगन” हे नाव असलेला बंगला राहायला देण्यात आला होता. परंतु हा बंगला काही वसंतराव नाईक यांच्या पत्नीला आवडलेला नव्हता. वसंतराव नाईक यांना पावसावरील कविता ऐकायला खूप आवडायच्या.
पाऊस हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.मुलगा अविनाश याच्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब हे डक बंगल्यावरती राहायला आले. त्यादिवशी वसंतराव नाईक यांनी डक बिगन या बंगल्याचे नामांतर “वर्षा बंगला” असे केले. त्यानंतर 1963 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आकस्मित निधनानंतर वसंतराव नाईक यांच्यावरती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ पार पाडून वसंतराव नाईक हे वर्षा बंगल्यावर आल्यानंतर त्यांचे बंधू बाबासाहेब नाईक यांच्यासोबत त्यांचे संभाषण झाले की या वर्षा बंगल्यावरती आपण आल्यापासून आपले सर्व दिवस सुखाचे गेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा बंधू आणि त्यांच्या पत्नीने देखील वर्षा बंगल्यावर तीच आपण आपले इथून पुढचे दिवस काढायचे असा ठाम निश्चय केला. वसंतराव नाईक यांनी वर्ष निवासस्थानाच्या बागे मध्ये विविध प्रकारची झाडे लावून बंगल्याची शोभा वाढवली.
पंडित जवाहरलाल नेहरू वर्षा बंगला भेट
1964 साली त्या वेळचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या पत्नी ज्या त्या वेळेच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल या पदावर ती कार्यरत होत्या महाराष्ट्र राज्यामध्ये भेटीला आले होते. त्यावेळी वसंतराव नाईक यांनी वर्षा बंगल्याच्या बगीचा मध्ये त्यांच्यासोबत जेवणाची व्यवस्था केली होती. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये अन्नधान्य आणि शेती या दोन विषयांना खूप महत्त्व दिले होते. महाराष्ट्र राज्य हे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असायला हवे हे त्यांचे ध्येय होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि वर्षा बंगला सोडून पुसद गाठले. परंतु तिथून पुढे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानासाठी वर्षा हाच बंगला निवडला आणि तीच प्रथा पुढे कायम होत गेली.
वर्षा बंगल्याचे फोटो पाहण्यासाठी या लिंक वरती क्लिक करा https://www.gettyimages.in/editorial-images/news/event/three-government-bungalows-of-maharashtra-chief-minister-eknath-shinde/775901941
अशाप्रकारे वर्षा हा बंगला मुख्यमंत्री यांचा निवासस्थान बनत गेला आणि तो कायमचा मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान म्हणून ओळखायला जाऊ लागला. आणि वसंतराव नाईक यांनी वर्षा बंगला हे नाव देण्याच्या अगोदर मुंबईमधील सह्याद्री बंगला हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान होते. वसंतराव नाईक यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर वर्षा बंगला हाच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखला जाऊ लागला आणि सह्याद्री हा बंगला उपमुख्यमंत्र्यांसाठी निवासाला देण्यात येऊ लागला आणि तीच प्रथा आतापर्यंत कायम होत आलेले आहे.
आता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणजे त्याला एक वेगळंच स्थान राज्यामध्ये असणार हे काय वेगळं सांगायची गरज नाही. आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचा जो कोणी मुख्यमंत्री होतो तो आपला मुक्काम लगेच वर्षा या निवासस्थानी हलवतो आणि तेथेच आपला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपेपर्यंत राहतो. याचाच अर्थ महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे सत्ता केंद्र म्हणून वर्षा या बंगल्याला ओळखले जाते. देशातील राज्यातील मोठमोठ्या पदावरील व्यक्ती आणि राज्यातील देखील मोठमोठे नेते तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका देखील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच होत असतात. या सर्व गोष्टींमुळे वर्षा या बंगल्याला महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाचे स्थान मिळून गेलेले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री जो कोणी असतो त्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण वर्षभरातील प्रत्येक सण हा वर्षा बंगल्यावर ती खूप ताटात साजरा केला जातो. मग तो गणेश चतुर्थीचा सण असो शिवजयंती असो किंवा गुढीपाडवा असो प्रत्येक सणाला राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती वर्षा या बंगल्यावरती हजेरी लावतात आणि तो सण तो दिवस मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर साजरा करतात. वर्षा बंगल्याचे क्षेत्रफळ हे 1200 चौरस मीटर असून या बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, वेटिंग हॉल आणि बैठकीची जागा आहे. हा बंगला मुंबई येथील मलबार येथे स्थित आहे. अशा प्रकारची आतील बाजूची वर्षा या बंगल्याची रचना करण्यात आलेली असून या बंगल्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील तसेच महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठका सतत होत राहत असतात.
अशा प्रकारचा वर्षा या निवासस्थानाचा आणि मुख्यमंत्री पदाचा हा संपूर्ण इतिहास आहे. आपण या पोस्टमध्ये पाहिलं की कशाप्रकारे वसंतराव नाईक यांच्या 19 वर्षाच्या प्रदीर्घ मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यकाळानंतर डक बिगन या बंगल्याला वसंतराव नाईक यांनी वर्षा हे नाव दिले आणि तेच नाव पुढे कायम राहत मुख्यमंत्र्यांचे कायमचे निवासस्थान बनत गेले. आतापर्यंत जेवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी वर्षा हेच निवासस्थान आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापर्यंत निवासासाठी निवडलेले आहे. आणि अशाच प्रकारे इथून पुढे देखील भविष्यामधील जे कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत राहतील त्यांनी देखील हीच प्रथा कायम पाळतील का?.