महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय पालकमंत्री :-
22 नोव्हेंबर 2024 रोजी लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यांमधून भाजप आणि मित्र पक्षांचे सर्वात जास्त आमदार निवडून येऊन महायुती सरकारला महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यात एक हाती यश मिळाले आहे. त्यानंतर संपूर्ण देशभर एकच चर्चा उठली होती की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या नावाच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यानंतर अगदी काही दिवसातच झालेल्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला.
5 डिसेंबर 2024 या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे काही प्रमुख आमदारांच्या आणि सर्व पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर काही प्रमुख तिन्ही पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर सर्वत्र कोणाला कोणते मंत्रिपद भेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अगदी काही दिवसानंतर तोही टिढा सुटला. मग आता प्रश्न उरला तो महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी च्या पालकमंत्री पदाचा?
*हे ही वाचा https://chaufer24.com/follow-these-life-rules/
26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील 36 पालकमंत्री पदांची यादी सर्वांसमोर येईल अशा चर्चांना उधाण उठले होते. यामध्येच आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील जिल्हा निहाय पालकमंत्री पदाची यादी महायुती सरकार करून जाहीर करण्यात आली आहे. आपण आतापर्यंत सर्वांनी बातम्यांच्या माध्यमातून पाहिलेच असेल की ज्या त्या जिल्ह्यामधून प्रत्येक मंत्र्याकडून आपण स्वतःच पालकमंत्री पदासाठी पात्र असल्याचे वारंवार पटवून सांगण्यात येत होते. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद मिळणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण आमदार सुरेश धस यांनी देखील खूप उचलून धरले होते आणि त्यांचा थेट निशाणा हा धनंजय मुंडे यांच्या वरती होता. यामागे सुरेश धस यांना बीडचे पालकमंत्री पद पाहिजे होते हे काय वेगळे सांगायची गरज नाही. अशा सर्व चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री कोण हे अगदी सर्वांसमोर स्पष्ट झाले आहे. चला मग पाहूया महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांचे जिल्हा निहाय पालकमंत्री कोण कोण असणार आहेत?
महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री :-
क्र. | जिल्हा | नियुक्त केलेला पालकमंत्री |
1. | रत्नागिरी | उदय सामंत |
2. | जालना | पंकजा मुंडे |
3. | चंद्रपूर | अशोक उईके |
4. | धुळे | जयकुमार रावल |
5. | नांदेड | अतुल सावे |
6. | सिंधुदुर्ग | नितेश राणे |
7. | कोल्हापूर | प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ |
8. | गडचिरोली | आशिष जयस्वाल |
9. | वर्धा | पंकज भोयर |
10. | परभणी | मेघना बोर्डीकर |
11. | अकोला | आकाश फुंडकर |
12. | गोंदिया | बाबासाहेब पाटील |
13. | हिंगोली | नरहरी झिरवळ |
14. | भंडारा | संजय सावकारे |
15. | छत्रपती संभाजीनगर | संजय शिरसाठ |
16. | धाराशिव | प्रताप सरनाईक |
17. | बुलढाणा | मकरंद जाधव |
18. | सातारा | शंभूराज देसाई |
19. | रायगड | आदिती तटकरे |
20. | लातूर | शिवेंद्रसिंहराजे भोसले |
21. | नंदुरबार | माणिकराव कोकाटे |
22. | सोलापूर | जयकुमार गोरे |
23. | पुणे | अजित पवार |
24. | बीड | अजित पवार |
25. | ठाणे | एकनाथ शिंदे |
26. | मुंबई शहर | एकनाथ शिंदे |
27. | नागपूर | चंद्रशेखर बावनकुळे |
28. | अमरावती | चंद्रशेखर बावनकुळे |
29. | अहिल्यानगर | राधाकृष्ण विखे पाटील |
30. | गडचिरोली | देवेंद्र फडणवीस |
31. | वाशिम | हसन मुश्रीफ |
32. | सांगली | चंद्रकांत पाटील |
33. | नाशिक | गिरीश महाजन |
34. | पालघर | गणेश नाईक |
35. | जळगाव | गुलाबराव पाटील |
36. | मुंबई उपनगर | आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा |
तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांच्या 36 पालकमंत्र्यांची नियुक्ती ही त्या त्या जिल्ह्यानुसार केलेले आहे. देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दोन दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवून घेतलेले आहे. आता यामध्ये अनेक नेत्यांकडून पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराजी देखील व्यक्त करण्यात येत असून सर्वांचे लक्ष लागून असलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे अजित पवार यांनी स्वतःकडेच राखून ठेवलेले आहे. आता झालेला हा पालकमंत्री पदाचा विस्तार आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार यावरून असे लक्षात येते की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार हे पूर्णपणे सत्ता गाजवण्यासाठी तयार झालेले असून आता त्यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासने कितपत पूर्ण करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्र जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहेत.
जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी एवढी धडपड का करतात आमदार :
एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणे ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मोठी देखील. प्रत्येक तालुक्यासाठी एक एक आमदार जनतेतून निवडून दिलेला असतो. तोच जनतेतून निवडून दिलेला आमदार आपल्या आपल्या तालुक्यातील जनतेचे प्रश्न आणि विकास कामांसाठी चे सर्व मुद्दे विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांच्या समोर मांडतो आणि तिथून आपल्या आपापल्या तालुक्यासाठी लागणारे विकास कामांची मंजुरी मिळवून घेतो. त्याचबरोबर ठराविक काही राज्यातील आमदार म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांना मंत्रिपद दिले जाते. परंतु एकाच जिल्ह्यामधून अनेक उमेदवारांना मंत्री पद दिले जाते. मग त्यावेळी पालकमंत्री पदाची किंमत वाढते. कारण एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद म्हणजे त्या जिल्ह्यामधून येणारे सर्व आमदार आणि मंत्री यांच्यासाठी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री हा एक प्रकारे मुख्यमंत्रीच असतो.
पालकमंत्री असणाऱ्या जिल्ह्यासाठी जो काही विकास कामांसाठी लागणारा निधी असतो किंवा सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक योजनेसाठी घेण्यात येणारा महत्त्वपूर्ण निर्णय हा पालकमंत्री यांच्या हातामध्ये असतो.मग राज्य सरकार कडून येणारा निधी असो किंवा एखादी योजना असो या सर्व गोष्टींमध्ये राज्य सरकार आणि जिल्हा यामध्ये एक दुवा म्हणुन पालकमंत्री काम करतो. एखाद्या आमदाराला आपापल्या तालुक्यासाठी निधी मंजूर करायचा असेल तर त्या जिल्ह्यासाठी नेमणूक केलेल्या पालकमंत्र्याची सही अत्यंत आवश्यक असते. कोणताही जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या तालुक्यासाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीला पालकमंत्र्याच्या सदस्य वाय मंजुरी भेटत नाही. याच कारणासाठी पालकमंत्री पद हे राज्यमंत्रीपद मिळणे इतकेच महत्त्वाचे असते. तसेच पालकमंत्री पद मिळाल्यानंतर विधान भवनामध्ये विशिष्ट असे ऑफिस दिले जाते जिथून नियुक्त केलेला पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा कारभार तिथे बसून व्यवस्थितपणे पार पाडू शकतो.
याच कारणांसाठी सध्या राज्यामध्ये पालकमंत्री पद या पदासाठी प्रत्येक झालेल्या आमदाराकडून रस्सीखेच सुरू आहे. परंतु प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची माळ ही कोणाच्या गळ्यामध्ये पडेल हे येणारी वेळ सांगेल. राज्यातील किंवा देशातील जे काही देशाचे सण असतात जसे की स्वातंत्र्य दिवस, 26 जानेवारी गणतंत्र दिवस आणि 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियुक्त केलेल्या त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. त्यामुळे हा ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी देखील पालकमंत्री पद मिळणे हे खूप आवश्यक आहे. या सर्व कारणांमुळे राज्यभरातील निवडून आलेले प्रत्येक तालुक्यातील आमदार हे प्रथमतः मंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न करतात. एकदा मंत्रीपद मिळाले की त्यानंतर या जिल्ह्याच्या तालुक्यामधून ते निवडून आलेले आहेत त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठीची धावपळ सुरू होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री निवडण्याचे पूर्णपणे अधिकार हे जात्या पक्षाच्या पक्ष श्रेष्ठींकडे असतो. भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असो किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो या गटातील पक्षश्रेष्ठी या निवडून आलेल्या आमदारांना पालक मंत्री म्हणून निवडतील त्यांनाच पालकमंत्री पदाची खुर्ची मिळणार आहे. मग आता एखादा आमदार कोणत्याही मतदारसंघातून निवडून आलेला असला तरी जर त्याला पालकमंत्री पद मिळाले तर असे नाही की तो ज्या जिल्ह्यामधून निवडून आलेला आहे त्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पद मिळेल. निवडून आलेल्या आमदाराला जर पालकमंत्री पद मिळाले तर तो राज्यांमधील कोणत्याही जिल्ह्यामध्ये पालक मंत्री म्हणून नियुक्त केला जातो. आणि त्याला तेथील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामकाज पहावे लागते.