मकर संक्रांती सण :-
तर नमस्कार मित्रांनो आज 14 जानेवारी 2025 नवीन वर्ष 2025 या वर्षातील पहिलाच हिंदू सण. या दिवसाची महत्वाची आठवण म्हणजे “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ” असा म्हणुन लहाना मोठ्यांना तिळगुळ देण्याचा क्षण. या दिवशी हिंदू प्रथेप्रमाणे महिला सजून-धजून मंदिरात जातात आणि ठरलेला मकर संक्रांतीच्या सणाचा विधी पूर्ण करतात. मग या मकर संक्रांतीच्या सणाच हिंदू परमपरेमध्ये काय विशेष महत्व आहे? मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो. तर चला मग जाणून घेऊया मकर संक्रांती या सणाविषयी थोडक्यात माहिती. मकर संक्रांती हा सण भारत देशात विविध राज्यात विविध पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्य हा मकर राशि मध्ये प्रवेश करतो आणि दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो.
मकर संक्रांती 2025 :-
2025 या वर्षांमध्ये सुरुवातीला 14 जानेवारीला मकर संक्रांती हा सण आलेला आहे.यासोबत “भोगी” हा पण सण साजरा केला जातो जो कि 13 जानेवारी 2025 या दिवशी आला. 14 जानेवारी 2025 मकर संक्रांति पासून दिवस हा मोठा मोठा होत जाणार असून रात्र लहान होत जाईल. त्याच दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि त्याचे उत्तरानयन सुरू होईल. या दिवशी महिला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून सूर्य उगवल्यानंतर सूर्यदेवतेची पूजा अर्चना करतात व सूर्याला नैवेद्य दाखवतात. संघाचे झाले तर मकर संक्रांती या सणा दिवशी सूर्यदेवतेची पूजा केली जाते. सूर्य हा पौष महिन्यामध्ये मकर राशि मध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला आपण मकर संक्रांति हा सन साजरा करतोय.

मकर संक्रांती या सणाचे वैज्ञानिक महत्त्व :-
मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जसे विशेष महत्त्व आहे. पद्धतीने मकर संक्रांति हा सण संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो. तसेच ज्या पद्धतीने साजरा केला जातो त्याला धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही बाजूंनी खूप महत्त्व आहे. तू जाणून घेऊ मकर संक्रांति या सणासाठी वैज्ञानिक दृष्टीने काय महत्त्व आहे.
- मकर संक्रांति या सणाच्या दिवसापर्यंत दिवस हा लहान असतो आणि रात्र खूप मोठे असते त्याचप्रमाणे थंडी देखील खूप असते.
- मकर संक्रांति या दिवसाचे विशेष महत्त्व सांगायचे झाले तर या दिवशी दिवस आणि रात्र दोन्ही समान असतात.
- मकर संक्रांती या दिवसानंतर हवामानामध्ये बदल व्हायला सुरू होतात आणि थंडीचे दिवस हळूहळू कमी होत जातात.
- तसेच मकर संक्रांति या सणाच्या नंतर च्या दिवसापासून दिवस हा मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते.
- मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवसानंतर सूर्य हा मकर या राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्याचे उत्तराणायन सुरू होते.
- उत्तरानयन म्हणजे सूर्य हा दिवसेंदिवस उत्तर दिशेमध्ये सरकत सरकत उगवतो.
- मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ वाटतो त्या मागच्या वैज्ञानिक कारण म्हणजे तिळामध्ये उष्णता असते आणि मकरसंक्रांती या सणामधे यावेळेस वातावरणामध्ये थंडी असते.
अशा प्रकारचे काही धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व मकर संक्रांति या सणाचे आहेत. मकर संक्रांती या सणाला महाराष्ट्र मध्ये मकर संक्रात तर दक्षिण भारतामध्ये पोंगुळ या नावाने साजरा केला जातो. य्क दिवशी शेतामध्ये आलेल्या पिकांची पूजा केली जाते. तसेच घरी जेवणासाठी विशेष मेजवानी केली जाते.
मकर संक्रांती या सणाचे धार्मिक महत्व :-
- हिंदू धर्म मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु होते जे कि खूप शुभ आहे असे मानले जाते.
- या दिवशी दाणधर्म केल्याने पुण्य भेटते असे मानले जाते.
- मकर संक्रांती या दिवशी सूर्य देवतेची पूजा केली जाते.
- या दिवशी तिळगुळ व लाडू एकमेकांना वाटले जातात. आणि तिळगुळाच्या गोडव्याप्रमाणे गोड बोला असे म्हणले जाते.
तर अशा पद्धतीने मकर संक्रांती या सणा दिवशी ज्या काही विधी केल्या जातात त्या विधींना धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही बाजूंनी खूप विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुला पतंग उडवण्याचा आनंद घेतात. तसेच महिला या मातीच्या मडक्यामध्ये या ऋतूमध्ये ज्या ज्या पिकाचे फळ आले आहे त्याचे थोडे थोडे अंश घेऊन मंदिरामध्ये वाहतात आणि एकमेकींना देऊन मकर संक्रांति हा सण साजरा करतात. मकर संक्रांति या दिवसाला दक्षिणात्य राज्यांमध्ये” पोंगुल ” खूप मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. बऱ्याच ठिकाणी या सणा दिवशी मोठमोठ्या जत्रेचे स्वरूप निर्माण होते. गावामध्ये राहणारे लोक आणि काही कामानिमित्त शहरांमध्ये गेलेले सर्व जण एकत्र येऊन हा सण अगदी मोठ्या थाटात साजरा करतात.