---Advertisement---

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर. भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यात यश. कोण होणार दिल्ली चा मुख्यमंत्री?

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर. भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यात यश. कोण होणार दिल्ली चा मुख्यमंत्री?
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 :

देशभरात सर्वत्र भाजप या पक्षाचे प्रत्येक राज्यामध्ये होणाऱ्या राज्यसभा विधानसभा निवडणुकींमध्ये संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा पक्ष होत चाललेला असून. आत्ताच 2024 मध्ये झालेल्या देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये मिळून आपले सरकार स्थापन केलेले आहे. त्यात सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून एक मताने निवड केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष विधानसभा निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये यश मिळालेले होते. भाजप आणि त्यांचे मित्र पक्षांचे मिळून सरकार स्थापन झालेले असून चे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत. त्याचबरोबर त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट निवडक आमदारांना मंत्र पदाची ऑफर देण्यात आलेले आहे.

विधानसभा निकाल बघण्यासाठी ऑफिसिअल वेबसाईट https://results.eci.gov.in/ResultAcGenFeb2025/index.htm

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यासाठी दोन उपमुख्यमंत्री यांची निवड करण्यात आलेली आहे. हे एवढे मोठे यश महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये भाजप या पक्षाने मिळवलेले असतानाच.दिल्लीमध्ये भाजप या पक्षाने तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा एखादी सत्ता मिळवल्यामध्ये यश मिळवले आहे. भारत या देशाची राजधानी असणारी दिल्ली हे सत्तेचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्यामुळे दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने सत्ता मिळवणे म्हणजे भाजपच्या राजकीय दृष्टिकोनातून हे एक खूप मोठे यश मानले जाते. कारण गेल्या 27 वर्षांपासून भाजपला दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्यामध्ये सतत अपयश मिळाले होते. आता 2025 मध्ये झालेल्या नुकत्याच दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप या पक्षाला बहुमत मिळवत हे खाते सत्ता मिळवण्यामध्ये पूर्णपणे यश मिळालेले दिसून येते.

दिल्ली विधानसभेवरती आत्तापर्यंतचे आम आदमी पार्टीचे वर्चस्व :-

दिल्ली विधानसभेमध्ये आतापर्यंत आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली 2013 पासून 2024 पर्यंत सरकार स्थापन केलेले होते. तसेच पंजाब मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला पंजाब राज्याच्या विधानसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पंजाब राज्याच्या जनतेने आम आदमी पार्टीचे सर्वात जास्त आमदार निवडून देऊन मान दिला होता. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष संपूर्ण सामान्य जनतेचा आहे असे अरविंद केजरीवाल वारंवार सांगत होते आणि त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीचे जनता ही विश्वास ठेवून आतापर्यंत विधानसभेसाठी पूर्णपणे बहुमत देऊन रवींद्र केजरीवाल हे आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या :

नुकत्याच झालेल्या फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी लागलेल्या दिल्ली विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालातून संपूर्ण देशासमोर एक स्पष्ट चित्र निर्माण झाले. त्याचबरोबर दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 च्या माध्यमातून एक अतिशय धक्कादायक बातमी संपूर्ण देशाने पाहिली ती म्हणजे आतापर्यंत दहा ते बारा वर्षे ठोकून असलेले आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुक 2025 मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळाला. यामध्ये विशेष असं सांगायचं म्हणजे भाजप हा पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 मध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला.

त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत देशामध्ये सर्वत्र आपली सत्ता गाजवणारा काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष या पक्षाला दिल्ली या विधानसभा निवडणुकांमध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव मानला जातो. परंतु सर्वात विशेष सांगायचे झाले तर आम आदमी पार्टी या पक्षाला देखील दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 मध्ये संपूर्ण बहुमत मिळवता आलेले नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप हा दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 670 जागांपैकी 48 जागांवर ती विजय मिळवत दिल्लीमध्ये आपली एखादी सत्ता मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार ठरत आहे. आम आदमी पार्टीला दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये 70 जागांपैकी 22 जागा निवडून आणण्यामध्ये यश मिळालेले आहे.

  • भाजप पक्षाला दिल्ली विधानसभा 2025 निवडणुकांमध्ये एकूण 70 पैकी 48 जागेवरती त्यांचे आमदार निवडून आले.
  • आम आदमी पार्टी या पक्षाला दिल्ली विधानसभा मध्ये 70 पैकी 22 आमदार निवडून आणण्यामध्ये यश मिळाले.
  • राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये 70 पैकी एकही आमदार निवडून आणता आलेला नाही.

अशाप्रकारे वरील निवडून आलेल्या आमदारांच्या आकडेवारीनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप या पक्षाने अगदी सहजरीत्या एका ते सत्ता मिळवत आपले सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळवलेले आहे. आता पाहूया दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये कोणते आमदार हे जास्त फरकाने निवडून आलेले आहेत आणि त्यांनी कोणकोणत्या माजी आमदार यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. सर्वात विशेष सांगायचे झाले तर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच अरविंद केजरीवाल यांच्यात पार्टीचे दिल्ली राज्याचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांचा देखील या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झालेला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले माजी मंत्री:-

  1. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल.

दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 मध्ये सर्वात मोठा पराभव हा मानला जातो तो म्हणजे दिल्ली राज्याचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा. भाजप पक्षाचे प्रवेश वर्मा त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांना 30,088 मतं मिळाली आणि अरविंद केजरीवाल यांना 25,999 एवढी मते मिळाली. त्यामुळे भाजपचे प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 4,089 एवढ्या मताधिक्याच्या फरकाने पराभव केला.

2. दिल्ली दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांचा पराभव.

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये दिल्ली राणी माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख नेत्यांपैकी एक मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. भाजप पक्षाचे तरविंदर सिंह मारवाह यांनी मनोज सिसोदिया यांचा 675 मतांनी जंगपुरा मतदारसंघातून पराभव केला. आम आदमी पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सलग तीन वेळा आमदार झालेले होते परंतु त्यांना 2025 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप या पक्षाकडून पराभव पत्करावा लागलेला आहे.

अशाप्रकारे दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीच्या सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या दोन आणि त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक माजी मंत्र्यांना आता झालेल्या निवडणुकांमध्ये पराभव करावा लागलेला असून हा सर्वात मोठा पराभव मानला जातो. भाजप या पक्षाला 70 पैकी 48 जागांवर ती आपले आमदार निवडून आणण्यामध्ये यश मिळालेले असतानाच आता प्रश्न उरतो तो म्हणजे सत्ता स्थापनेचा. सत्ता स्थापन केल्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार करणे हे देखील भाजप या पक्षापुढे आता सर्वात मोठे आव्हान मानले जाते. कारण मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये गटबाजीचे राजकारण घडत असते आणि निवडून आलेल्या आमदारांमध्ये नाराजीचे सत्र सुरू व्हयला सुरु होते.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार कोण :-

सध्या तरी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपचे दिल्ली राज्याचे प्रमुख नेते मानले जाणारे आणि दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 मध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्री असणारे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीच्या आणखी काही प्रमुख माजी मंत्र्यांना धूळ चारत निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांना देखील मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु सध्या तरी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे भाजप पक्षाकडून कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला भाजप या पक्षाकडे दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची हा एक खूप मोठा प्रश्न आहे. भाजपला असं मुख्यमंत्री निवडावा लागेल जो की पक्ष आणि दिल्ली राज्य या दोन्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे कारभार करू शकेल.

---Advertisement---

Leave a Comment