---Advertisement---

जवान चंदू चव्हाण याच्यावर भीक माग आंदोलन करायची वेळ का आली?

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
जवान चंदू चव्हाण याच्यावर भीक माग आंदोलन करायची वेळ का आली?
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या देशातील लष्करी सैन्याने पाकिस्तानच्या गुपित अड्ड्यावरती सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. यातीलच एक सर्वांना परिचित असलेला सर्जिकल स्ट्राईक म्हणजे उरी सर्जिकल स्ट्राइक या सर्जिकल स्ट्राइक वरती बॉलीवूड ने चित्रपट देखील बनवला होता आणि तो तितकाच चर्चेत देखील आला होता. परंतु या सर्व बातम्या येत असतानाच उद्देश आनंदाच्या वातावरणात असताना एक दुःखाची बातमी आली होती ती म्हणजे भारताचा एक जवान पाकिस्तानच्या सैन्याच्या ताब्यात सापडला होता. त्याचं नाव होतं चंदू चव्हाण. त्यानंतर भारतीय सरकारने पाकिस्तानच्या सरकारशी चर्चा करून जवान चंदू चव्हाण यांना भारतात परत आणले. परंतु जसे ते भारत देशामध्ये परतलेत तेव्हापासून ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात त्यातीलच आत्ताच एक नवीन कारण म्हणजे त्यांनी विधान भवन समोर चालू केलेला आंदोलन.

जवान चंदू चव्हाण यांनी एक जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र विधान भवनाच्या समोर भिक मागो आंदोलन सुरू केले आहे. या पोस्टमार्फत जाणून घेऊया जेवण चंदू चव्हाण यांच्या वरती भीक मागो आंदोलन करण्याची वेळ का आली त्या मागची नेमकी कारणे काय आणि त्यांच्या मागण्या काय आहेत.

कोण आहे हा जवान चंदू चव्हाण :

तर चंदू चव्हाण हा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील बोरविहार या छोट्याश्या गावाचे सुपुत्र आहेत. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्याने त्यांचा संभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला. 2016साली ते भारतीय लष्करामध्ये दाखल झाले होते. आणि त्याच वर्षी झालेल्या सर्जिकल स्ट्राइक मध्ये ते एकदम अगदी गायब झाल्यासारखे झाले. त्यानंतर पाकिस्तान कडून बातम्या आली की एक भारतीय जवान पाकिस्तानची सीमा ओलांडताना पकडण्यात आला. आणि जवान चंदू चव्हाण हा देखील बेपत्ता असलेल्या बातम्या समोर येऊ लागल्या त्यावरून लक्षात आले की पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान हा दुसरा कोणी नसून चंदू चव्हाण हाच आहे. याच बातमीने धडकी लागून त्याच्या आजीचे हार्ट अटॅक ने निधन देखील झाले.

त्यानंतर चंदू चव्हाण यांच्या भावाने धुळ्याचे खासदार आणि त्यावरचे केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्याकडे त्यांनी मदत मागून आपल्या भावाला पाकिस्तानच्या लष्करातून सोडवण्यासाठी आटोणाट प्रयत्न केले. भारतीय संरक्षण मंत्रालय आणि पाकिस्तान लक्ष यांच्यामध्ये जवळपास 15 ते 20 वेळा चर्चा झाली आणि यावरून भारतीय सैन्याने असे पटवून दिले की चंदू चव्हाण हा चुकून पाकिस्तानच्या सीमा ओलांडून गेला आहे. तब्बल पंधरा-वीस वेळा चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानलाही या गोष्टी विश्वास बसला आणि अखेर 17 जानेवारी 2017 रोजी पाकिस्तानने जवान चंदू चव्हाण ला भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले.

जवान चंदू चव्हाण चा खरा संघर्ष :

तर अशाप्रकारे चंदू चव्हाण हे भारतीय लष्करामध्ये परत आल्यानंतर त्यांचा संघर्ष काही थांबेना. त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की मी चुकून चौकी सोडून चुकून पाकिस्तानच्या सिमेपलीकडे गेलो होतो. या चुकीमुळे लष्करी न्यायालयाने चंदू चव्हाण यांना दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. परंतु ही शिक्षा भोगल्यानंतर त्यांनी पुन्हा सैनिक दलात दाखल झाले. तिथून त्यांना पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या किस्से बद्दल विचारण्यात येत होते आणि त्यांना अधिकाऱ्यांकडून खूपच त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आणि दोन वर्षानंतर म्हणजेच 2019 वर्षी त्यांनी आपल्या सैनिक पदाचा राजीनामा दिला.

परंतु चंदू चव्हाण यांनी केलेले सर्व आरोप भारतीय लष्कराने फेटाळून लावले होते. तर चव्हाण हे भारतीय लष्कराचे नियम वारंवार सोडत आहेत आणि त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केले होते असे भारतीय लष्करा करून सांगण्यात येते. त्याचबरोबर चव्हाण हा आपल्याला युनिट मधून काही दिवसांसाठी फरार होता असेही सांगण्यात येते. तर या सर्वांचे विरोधात जवान चंदू चव्हाण यांनी भीक माग आंदोलना, तर आपल्या कुटुंबासोबत बरीच आंदोलन केले आहेत. आज एक भाग म्हणून बुधवारी एक जानेवारी रोजी त्यांनी आंदोलन केले त्यात ते म्हणाले,

“इतके दिवस मी लढतोय परंतु मला केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अजूनही शासकीय नोकरीमध्ये स्थान दिलेले नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मला कसल्याही प्रकारची पेन्शन योजना ही लागू करण्यात आलेली नाही. या सर्वांमुळे माझ्यावर खूप मोठा आर्थिक संकट आल्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मी मागील चार महिन्यापासून आंदोलन करतोय. आम्ही देशाच्या सैन्यात देशी सेवा करण्यासाठी जातो दहशतवादी बनण्यासाठी नाही असेही चंदू चव्हाण यांनी सांगितले. तर सैन्यातील उच्च अधिकारी शिस्तीच्या आणि नियम तोडल्याच्या नावाखाली मला घरी पाठवतात. जवानांना दिली जाणाऱ्या शिक्षेचा व्हिडिओग्राफी व्हायला पाहिजे म्हणजे सर्वांसमोर सत्य समोर येईल”.

तसेच पाकिस्तान मधून आलेल्या सीमा हैदरला नोकरीच्या ऑफर दिली जात आहे परंतु मी एक देशाचा रहिवासी आणि माजी सैनिक असून तरीदेखील मला कसल्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याची खंत देखील जवान चंदू चव्हाण यांनी व्यक्त केली.

---Advertisement---

Leave a Comment