जमिनीसाठी होणारे वाद :
आत्तापर्यंतचा जमिनीच्या बाबतीतला इतिहास सांगतो कि पिढ्यानं पिढ्या जमिनीच्या बांधा संदर्भात तर कधी मालकीण हक्कासंदर्भात कायम भांडण तंटा होत असतात. त्या भांड्यात रूपांतर कधी कधी अगदी मोठ्या भांडणांमध्ये देखील होते आणि त्यामधून दोन गटांमध्ये मारामारी देखील होणार. यात शेत जमिनीच्या मुद्द्यावरून होणारी भांडण हे वर्षानुवर्षे चालणाऱ्या न्यायालयातील खटल्यांमध्ये देखील दाखल होते. आणि नंतर चालू होते ते न्यायालयातील खटल्यावर तारीख पे तारीख अशी प्रक्रिया. या न्यायालयांच्या खटल्यांमध्ये शेतकरी आपल्या जमिनीच्या भांडणांसाठी आपल्या आयुष्याची कमाई घालवतो परंतु निकाल त्याच्या बाजूने लागेल याची शाश्वती फार कमी असते. जमिनीचा मालकी हक्काबद्दल सांगायचे झाले तर आजकाल असे पाहायला मिळते की जमिनीखाच्या नावावर असते कागदपत्रे आणि ते कसून दुसराच पिकवत असतो.
या सर्व गोष्टी या घडतात त्या कागदपत्राची ओळख नसल्यामुळे. तसे काही पुरावे आहेत ज्यांच्या आधारे तुम्ही तुमच्या नावावर किती क्षेत्रफळ जमीन आहे आणि ते कुठे आहे तुम्ही किती जमिनीचे मालक आहात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला त्या पुराव्याच्या आधारे मिळेल. तर चला पाहूया तुमच्या नावावर जमिनी आहे हे पाहण्यासाठी नेमके कोणकोणते पुरावे तुम्हाला पहावे लागतील,
जमीन खरेदी खत :
तुम्हाला तुमची जमीन कोणाच्या नावावर आहे तुमच्या की अगदी अजून कोणाच्या याचे अचूक माहिती मिळण्यासाठी तुमच्याकडे जमीन खरेदी खत हा कागद असणे खूप गरजेचे आहे. या जमीन खरेदी खताला जमिनीच्या मूळ मालकाचा पहिला पुरावा असे देखील म्हणून ओळखले जाते. या पुराव्याच्या आधारे जमिनीचा मूळ मालक कोण आहे हे अगदी स्पष्ट समोर येते. जमीन खरेदी खत या कागदामध्ये जमीन कधी खरेदी केली, त्याचा व्यवहार कसा झाला, त्याची तारीख वार साल, किती क्षेत्रफळावरती खरेदी झाली, त्याचबरोबर खरेदी करणारा कोण आणि विक्री करणारा कोण याबद्दल देखील अगदी सविस्तर माहिती या खरेदी खतामध्ये दिलेले असते. सातबारा उताऱ्यावर नोंद आणण्यासाठी देखील या खरेदी खताची गरज लागते या खरेदी खताच्या आधारावरच सातबारा वरती जमिनीची नोंद करता येते.
जमिनीचा सातबारा उतारा :
तर जमिनीचा सातबारा उतारा हा जमीन मालकी हक्क बाबत एक महत्त्वपूर्ण पुरावा मानला जातो. या सातबारा वरती एकूण गटाचे क्षेत्रफळ, त्यामध्ये असणारे शेतकरी, कोणाच्या नावावर ती किती क्षेत्रफळ जमीन आहे, तसेच त्या त्या ठराविक वर्षापूर्वी घेतलेल्या पिकांची माहिती देखील सातबारा उतारा मध्ये अगदी अचूक आणि सविस्तर दिलेले असते. सातबारा उतारा हा देखील जमीन मालकी हक्काबाबत एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. या सातबारा उतारा मध्ये गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याच्या नावावरती एकूण किती क्षेत्रफळ आहे याची माहिती दिलेली असते. तसेच यामध्ये भोगवटदार याबद्दलची देखील अगदी सविस्तर माहिती दिलेली असते.
जमिनीचा अजून एक पुरावा म्हणजे 8 अ :
जमीन मालकी हक्क संदर्भात अजून एक महत्त्वपूर्ण पुरावा म्हणजे 8 अ या कागदपत्राला म्हणून ओळखले जाते. आठ अ या कागदपत्राला जमिनीचा खाते उतारा म्हणून देखील ओळखले जाते. या कागदपत्राच्या आधारे एखाद्या गावामध्ये तुमच्या नावावरती किती क्षेत्रफळ आहे आणि ती कोण कोणत्या गटामध्ये आहे याची माहिती दिलेली असते. त्यामुळे आठ हा देखील तुमच्या जमीन मालकी हक्क संदर्भातला महत्त्वाचा पुरावा मानला जातो. महाराष्ट्र सरकारच्या भूसंपादन खात्याने डिजिटल आठ हा कागदपत्र अगदी ऑनलाईन सुरू केले आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जमिनीचा आठ अ उतारा हा अगदी घरबसल्या देखील पाहू शकता.
जमीन मालकी पुराव्यामध्ये जमिनीचा नकाशा :
तर प्रत्येक गावोगावी गाव सरहद्दीचा तसेच प्रत्येक गटाचा क्षेत्रफळ दर्शवणारा जमिनीचा नकाशा हा देखील जमीन मालकी हक्क संदर्भात एक महत्त्वाचा पुरावा आहे. या नकाशांमध्ये गट नंबर सोबत त्या त्या गटामधील क्षेत्रफळाच्या सीमा दाखवलेल्या असतात त्या सीमा अगदी दिशा सोबत दाखवलेले असतात. त्यामुळे जमिनीचा नकाशा या कागदपत्रामुळे जमिनीची अगदी अचूक माहिती मिळण्यास मदत होते. या नकाशामध्ये आपल्या शेतात येण्यासाठी चा रस्ता गावाची सरहद्द पाऊलवाट किंवा शेत वाट या सर्व बाबतीत अगदी अचूक माहिती दिलेली असते.
दरवर्षी भरण्यात येणारा जमिनीचा महसूल :
आपण प्रत्येक वर्षी आपल्या शेती वरील महसूल हा आपापल्या विभागातील तलाठी कार्यालयामध्ये जमा करतो. तो कर जमा केल्यानंतर तलाठी आपल्याला एक पावती देतो. ती महसूल भरण्यास मदत आपली पावती हा देखील आपल्या जमीन मालकी हक्क बाबतचा एक ठोस पुरावा आहे असा आपण समजू शकतो.
जमीन मालकी हक्क पुरावा प्रॉपर्टी कार्ड :
जमीन मालकी हक्क संदर्भात बिगर शेत जमीन या क्षेत्रासाठी मालकी हक्क पुराव्यामध्ये सरकारद्वारे देण्यात येणारे प्रॉपर्टी कार्ड हा खूप खूप महत्त्वाचा पुरावा मानला जातो. शेतीसाठी जसे सातबारा उतारा हा अगदी महत्त्वाचा आहे त्याच प्रकारे बिगर शेती जमिनी संदर्भात प्रॉपर्टी कार्ड असणे म्हणजेच त्या जमिनीचा मालकी हक्क असणे असे मानले जाते.
तर अशाप्रकारे शेतकरी किंवा त्यांच्याकडे बिगर शेती जमीन आहे अशा व्यक्ती आपण घेतलेल्या जमिनी बाबतचा अगदी सविस्तर तपशील आणि अचूक माहिती यावरील पुरावांच्या आधारे मिळू शकतात.