---Advertisement---

छात्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 SHIVAJI MAHARAJ JAYANTI

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
छात्रपती शिवाजी महाराज जयंती 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

SHIVAJI MAHARAJ JAYANTI 2025 :

आज 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांनी(chhatrapati shivaji maharaj) जे मातृभूमीसाठी केले ते कार्य असाधारण आणि कोणालाही न जमणारे असे कार्य होते. त्यांनी आपल्या मातृभूमीचे संरक्षण परकीय आक्रमणापासून केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य हे एखाद्या राज्याचे राज्य म्हणून ओळखले जात नव्हते तर ते “स्वराज्य” म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य म्हणजेच स्व राज्य याचाच अर्थ स्वतःचे राज्य. स्वराज्य म्हणजे असे राज्य ज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जनतेला स्वतःचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वतःचे स्वराज्य अशी भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहणाऱ्या जनतेचे मनामध्ये निर्माण झाली होती.

shivaji maharaj images https://in.pinterest.com/pin/shivaji-maharaj–606649012315476840/

आज 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त जगभरामध्ये ठीक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते. 19 फेब्रुवारी या दिवसाला इतके महत्त्व कशामुळे आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी असे कोणते कार्य केलेले होते की ज्यामुळे आज जवळपास 400 वर्षे पूर्ण होत आली तरी देखील त्यांनी जो पराक्रम जवळपास 400 वर्षांपूर्वी केला होता तो आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि येणारी प्रत्येक पिढी ही याच पराक्रमाच्या गोष्टी हाच आपला इतिहास असे समजून तो पराक्रम आठवत राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जे स्वराज्य निर्माण केलेले होते त्या स्वराज्याची नेमकी रचना कशी केली होती आणि त्यांनी असे कोणते मोठे कार्य केले होते आपण आज या पोस्टाच्या माध्यमातून पाहूया.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

15 व्या शतकामध्ये संपूर्ण देशभरामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यांमध्ये देखील परकीय आक्रमणांनी संपूर्ण देश घेरला होता. त्यामध्ये मुघलांनी महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच देशभर आक्रमणे करत विविध ठिकाणी स्थानिक जनतेवर अन्याय आणि अत्याचार सुरू केले होते. त्यावेळी मुघलांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कोणाची हिंमत होत नव्हती. जो तो त्यांचे वतनदारी घ्यायचा आणि त्यांच्यासोबत काम करायचा. यामध्येच 16 व्या शतकामध्ये म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावरती राजे शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या बालपणामध्ये राजमाता जिजाऊ यांनी शूरवीरतेचे आणि संस्काराचे ज्ञान दिले. राज्याकरभार, प्राजतंत्र, नैतिकता, युद्धतंत्र अशा सर्व गुणांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या बालपणापासून देण्यात आली होती.

शिवाजी महाराज जसे मोठे होत होते तसतसे परकीय आक्रमणांचे किस्से त्यांच्या कानावरती पडत होते. त्यांच्याकडून केले जाणारे अत्याचार हे देखील शिवाजी महाराज पाहत होते. त्यांनी राजमाता जिजाऊंना विचारले की आपल्या रयतेला या सर्व अत्याचारापासून अन्यायापासून वाचवणारा कोणीही नाही का? तेव्हा राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना सांगितले होते की, जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार त्यांच्या सीमा पार करतो तेव्हा तेव्हा देवाचा अवतार पृथ्वीवर ती जन्माला येतो आणि हा त्याच्यावर दूर करतो. राजमाता जिजाऊ शिवरायांना महाभारत, रामायण यामधील शूरवीरांच्या कथा सांगत असत. या सर्व संस्कारांमुळेच लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये शूरवीर त्याची बीजे रोवली गेली होती.

सन 1636 साली शहाजीराजांची वडिलोपार्जित जहागिरी म्हणजेच पुण्याची जहागिरी सांभाळण्याची जबाबदारी राजमाता जिजाऊ आणि शिवरायांवरती सोपवण्यात आली. 1936 साली शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवत शेतीच्या मशागतीची सुरुवात करण्यात आली होती. जनतेच्या मनामध्ये त्यावेळी तेथील जमीन नापीक आणि अपवित्र झाली असे भरवण्यात आलेले होते त्याच काळामध्ये शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवत त्याच जमिनीची पुन्हा एकदा पीक पिकवण्यासाठीची मशागत सुरू केली होती. शहाजीराजांच्या जहागिरीमधील कार्यात मावळ प्रांतामधील छत्तीस गावे ही छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांकडून सुरुवातीला देण्यात आलेली होती. या 36 गावांचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज सुरुवातीला पाहत होते त्यामुळे हीच ती छत्तीस गावे पुढे तयार झालेल्या स्वराज्याची पूर्ववस्था होती. मावळ भागांमधील बारा मावळ प्रांतामधून शिवाजी महाराजांनी सवंगडी गोळा केले आणि त्यामुळेच त्यांना मावळे असे म्हटले गेले.

त्याच मावळ्यांसोबत शिवाजी महाराज यांनी 27 एप्रिल 1645 रायरेश्वराच्या मंदिरामध्ये “स्वराज्य स्थापनेची” शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी आपल्या सोंगाड्या सोबत स्वराज्याची स्थापना केली आणि जनतेच्या मनामध्ये आपले एक आता स्वतःचे स्वराज्य असेल असा विश्वास निर्माण केला. स्वराज्य निर्माण केल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची राजमुद्रा तयार केली ती राजमुद्रा म्हणजेच, “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। ।। प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” याचाच अर्थ असा होतो कि, ” प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे रोज वाढत जाणारे , जगाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, शहाजीराजांकडून ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी देण्यात आली. आणि तिथून सुरुवात झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या राज्यासाठी “स्वराज्याची”.

SHIVAJI MAHARAJ HISTORY :

28 जानेवारी 1646 रोजी शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहीत त्यावर प्रथमता राजमुद्रा उमठावत राझे गाव च्या गुजर पाटलाला शिक्षा सुनावली होती. शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतातील आदिलशाहीच्या कचाट्यातून सर्वप्रथम राजगड, कोंढाणा, तोरणा आणि पुरंदर हे किल्ले सोडवण्याची मुहूर्तमेढ ठरवली. सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून “राजगड” या किल्ल्याची निवड केली. 1648 मध्ये आदिलशाहीकडून पहिल्या आक्रमण शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यावरती करण्यात आलेले होते त्या आक्रमणामध्ये आदिलशाही सरदार फत्तेखान हा होता. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गनिमी काव्याचा वापर करून आदिलशाही विरुद्ध पहिली लढाई पुरंदर किल्ला परिसरामध्ये जिंकली होती. परंतु दुर्दैवाने या लढाईमध्ये स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर यांना वीरमरण प्राप्त झाले होते.

AFJAL KHAN VADH

छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य दिवसेंदिवस वाढत चालले होते त्यांनी कोकणामध्ये पूर्णपणे स्वराज्य विस्तारले होते. आदिलशहाच्या ताब्यातील सर्व प्रांत शिवाजी महाराज हे आपल्या स्वराज्यामध्ये दिवसेंदिवस सामील करत चाललेले होते त्यामुळे शिडी ला गेलेला आदिलशहा याने त्याच्या सरदारातील वीर पराक्रमी मातब्बर सरदार म्हणून आदिलशहा याला स्वराज्यावरती चालून जाण्यासाठी पाठवले. आदिलशहाने महाराष्ट्रामध्ये हिंदू मंदिरे तोडण्यास सुरुवात केली, त्याच्या वाटेमध्ये जो कोणी येईल त्याला ठार मारत तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे चालला होता. त्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची तुळजापूर येथील मूर्ती देखील तोडली होती. हे सर्व पाहून शिवाजी महाराजांनी त्याचा बंदोबस्त करण्याची तयारी सुरू केली. आणि त्याला गनिमी कावा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करून प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी बोलावले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध Wagh Nakh’ वाघ नख्यांनी त्याचा कोथळा फाडून गेला.

त्यावेळी अफजलखानाचा वध करणे म्हणजे जगामधील सर्वात मोठा पराक्रम होता. अफजलखानाचा वध तसेच पुण्यामधील लाल किल्ल्यामध्ये शाहिस्तेखानाची बोटे छाटणे, अफजलखानाने शिवाजी महाराजांना आग्रा मध्ये अटक केल्यानंतर तेथून अतिशय छानक्ष बुद्धीने स्वतःची सुटका करून घेणे, मार्च 1660 ते जुलै 1660 दरम्यान सिद्धी जोहरने घातलेल्या पन्हाळगडावरील वेड्यामधून स्वतःची सुटका करून घेणे अशा प्रकारचे खूप सारे पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये केले होते. पन्हाळ्यावरून सुटका करून घेताना रस्त्यामध्ये असणाऱ्या पावनखिंडीमध्ये 13 जुलै 1660 रोजी शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे सुखरूप पोहोचवून पावनखिंडीमध्ये मोघलांचा रस्ता अडवत बाजीप्रभू देशपांडे यांनी बलिदान दिले होते. त्यानंतर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला उदयभानाच्या तावडी मधून स्वराज्यासाठी जिंकून दिला आणि त्यामध्येच त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते.

अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सांगावे तेवढे किस्से कमी आहेत आणि त्यांनी केलेली स्वराज्यासाठीची जडणघडण ही आजही आणि इथून पुढे येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी एक आदर्श म्हणून मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे स्वतःच्या मातृभूमीसाठी तिने दिलेल्या जन्माची परतफेड करण्यासाठी होते. शिवाजी महाराजांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारे आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे असे शूरवीर पराक्रमी मातब्बर मावळे लावले आणि त्यामुळे हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न शक्य झाले. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार मुजरा.

---Advertisement---

Leave a Comment