---Advertisement---

चीन मधे कोरोना नंतर HMPV या व्हायरस चा धुमाकूळ

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
चीन मधे कोरोना नंतर HMPV या व्हायरस चा धुमाकूळ
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

2020 हे वर्ष आपल्याला सगळ्यांना अगदी सहज आठवतंय ते म्हणजे कोरोना व्हयरस यामुळे. या कोरोना व्हायरस ला 30 जानेवारी 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक महामारी म्हणुन घोषित कारण्यात आले होते. याच कोरोना महामारीमुळे जगभरात एकच धुमाकुळ घातला होता. लाखोंच्या संख्येने रुग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडत होते. त्यावेळी जगभरामध्ये जवळपास 70 कोटी लोकांना कोरोनाची लागवन झाली होती तर कित्येक जणांना आपले जीवही गमवावे लागले होते. तर बरोबर पाच वर्षानंतर जसा कोरोना 2020 या वर्षी चीन या देशापासून पसरायला सुरू झाला होता आणि तो अगदी जगभर पसरला होता. ह्याच कोरोनाव्हायरस मुळे संपूर्ण जग आणि संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. कुठेही दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी उपचार उपलब्ध नव्हते. अशी गंभीर परिस्थिती चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाव्हायरस मुळे जगाने पाहिलेले आहे.

बरोबर पाच वर्षानंतर चीनमध्ये अजून एका नव्या व्हायरसने चीनमधील दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगाच रांगा वाढवले आहेत. या व्हायरसचे नाव आहे HMPV Virus. हा HMPV व्हायरस कोरोना सारखाच भयंकर असून तोही हवेमार्फत सर्वत्र पसरतोय. HMPV VIRUS म्हणजेच HUMAN METAPNEUNO VIRUS. आतापर्यंत झालेल्या माहितीनुसार हा व्हायरस इतका खतरनाक आहे की यामुळे चीनमधील शेकडो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत तर असंख्य लोक या व्हायरसमुळे बाधित झाले आहेत. या व्हायरसचा प्रादुर्भाव हा लहान मुले आणि वयोवृद्ध यांच्यावरती लवकर होतो. HMPV VIRUS वर उपाय म्हणून मास्क वापरणे आणि आवश्यक ते काळजी घेण्याच्या सूचना चीनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.

HMPV VIRUS SYMPTOMS :

हा विषाणू कोरोना इतकाच धोकादायक असून याचा संसर्ग हवेतून पसरतो. तर या आजाराची लक्षणे काय काय आहेत,

  1. एच एम पी व्ही या विषाणूचा शरीरामध्ये संसर्ग होताच सर्दी आणि कोविड-19 सारखे लक्षणे दिसून येतात आणि याचा प्रादुर्भाव हा लहान मुले आणि वयोवृद्धांवर वेगाने होतो.
  2. आता हा व्हायरस हवेमधून पसरत असल्याने ज्या व्यक्तीला हा व्हायरस शरीरामध्ये शिरल्यास त्या व्यक्तीने शिंकल्यास आणि खोकल्यास हा वायरस पसरण्याची शक्यता जास्त आहे.
  3. जर या व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक तीव्र असेल तर ब्रोंकाइटिस आणि निमोनिया देखील होण्याची शक्यता आहे.
  4. चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या चीनच्या आरोग्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या व्हायरसची लक्षणे, खोकला येणे, ताप आणि घशात घसघस करणे यांचा समावेश आहे.

HMPV VIRUS पसरण्याची कारणे :

तर हा व्हायरस खोकल्याने आणि शिंकल्याने हवामार्फत पसरतोच तसेच अजूनही काही कारणे आहेत ज्यामुळे हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे.

  • HMPV हा व्हायरस खोकल्याने आणि शिंकल्याने पसरतो.
  • ज्या व्यक्तीला या व्हायरसचे संक्रमण झाले आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याचा प्रसार हा अधिक तीव्रतेने होतो. म्हणजेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस पसरतो.
  • कोरोनाप्रमाणेच याचा देखील प्रभाव चार ते पाच दिवसांमध्ये दिसायला लागतो.
  • हा व्हायरस पसरण्यासाठी हिवाळा हा ऋतू अत्यंत पोषक आहे असे मानले जाते. हिवाळ्यामध्ये हा व्हायरस झपाट्याने वाढतो.

वरील दिलेल्या कारणांमुळे हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. तर चीनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये दरवर्षी श्वसन संबंधित आजारांची संख्या ही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत असते. परंतु यावर्षी ती संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

HMPV VIRUS चा धोका भारताला आहे का :

तर आपण पाहिले आहे 2020 मध्ये जेव्हा चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत होता त्याचप्रमाणे चीनमधून येणारे भारतीय प्रवासी आणि विद्यार्थी यांच्यामार्फत कोरोना व्हायरस हा संपूर्ण भारत देशामध्ये देखील पसरला होता. आणि यामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. तर कोरोना बाधित रुग्णांना दवाखान्यामध्ये योग्य त्या सोयी देखील मिळत नव्हत्या अशी भयंकर परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे आताचा हा नवीन व्हायरस देखील अशाच प्रकारे आपल्या देशामध्ये येऊन पसरू शकतो हे शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून सांगायचा झाला तर सध्या तरी या व्हायरसवर कोणत्याही प्रकारचे औषध तयार झालेले नसून योग्य ती काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे.

या व्हायरस पासून वाचण्यासाठी गर्दीचे ठिकाणांमध्ये जाणे टाळावे, अगदी कोरोनात वापरत होतो त्याप्रमाणे मास्क वापरावे. स्वच्छता बाळगावी. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. कारण की आपल्याला माहीत नसते की मोबाईल वर दिसणारे व्हिडिओमध्ये सत्य कितपत आहे आणि फेक कितपत आहे यामुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

---Advertisement---

Leave a Comment