तर मित्रांनो आपल्याला शेतीचा पिकपेरा भरायचा असो किंवा विमा भरायचा असो आणखी अशी बरीच काही कामे असतात ज्यासाठी आपल्याला प्रमुख कागद म्हणून 7/12 या कागदाची गरज पडते. परंतु तो मिळवण्यासाठी एक पद्धतशीर मार्ग ठरवून दिलेला. त्यासाठी खूप वेळ लागतो . आपल्याला पाहिजे असलेला 7/12 तलाठ्याच्या सहिशिवाय त्याची किंमत 0 आहे. परंतु आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ऑनलाईन सातबारा मुळे तुम्हाला अगदी बसल्या ठिकाणी कोणत्याही वेळी मोबाईल मधून अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा काढता येणे अगदी सहज शक्य होणार आहे. तर पाहूया या पोस्टच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या डिजिटल सातबारा कशा पद्धतीने मोबाईल वरती ऑनलाईन रित्या काढू शकता?.
तर आधी जाणुन घेऊया 7/12 म्हणजे नेमक काय?
गाव नमुना 7 म्हणजे संबंधित शेतकऱ्याकड किती जमीन आहे हे दर्शवते ते गाव नमुना 12 हे पिकांची महिती नोंदविलेली असते. सातबाऱ्यावर शेतकऱ्यानं घेतलेल्या सर्व पिकांची महिती नोंदविलेली असते. सातबाऱ्यावर शेतकऱ्याच नाव गट न सर्वे न त्या गटामध्ये किती जणांची खाती आहेत. तसेच कोणाच्या नावावर किती क्षेस्त्र आहे हे सर्व नमूद केलेलं असत. 1910 साली एक योजना आली होती त्याच नाव होत अभिलेख योजना. या योजनेच्या माध्यातून सर्व जमिनींची मोजणी करून त्याचा एक अभिलेख तयार करण्यात आला त्यालाच सर्वे न असा म्हणतात. यातून एक कागद तयार करण्यात आला त्याला कडाईपत्रक असे म्हणून ओळखले जात होते. त्या वेळी या कडईपत्रावरून पिकांची महिती मिळवता येत होती. त्यानंतर 1930 साली इंग्रजांनी जमावबंदी करून कर वसूल करण्यात सुरुवात केली मग तेव्हापासून 7/12 हा उदयास आला.
7/12 मधे काय असते:-
यात शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे , त्याने कोणती पिके लावलीत, कोणाकडून जमीन घेतली अश्या प्रकारची सर्वं माहिती त्यामध्ये असते. एका गटामध्ये किती शेतकरी आहेत आणि प्रत्येकी शेतकऱ्यांच्या नावावरती किती किती क्षेत्रफळ आहे याबद्दलचा अगदी सविस्तर तपशील हा सातबारा या कागदपत्रामध्ये असतो. तसेच सातबारा हा कागदपत्र जमीन कोणाच्या मालकीची आहे याबाबतचा एक खूप महत्त्वाचा पुरावा म्हणून देखील ओळखले जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्याच्याकडे सातबारा पुरावा असेल जमीन त्याचीच असं म्हणलं तरी काही हरकत नाही.
Online 7/12 असा काढा
अगोदर 7/12 काढायचा म्हणजे तलाठी कार्यालयात फेरा माराव्या लागायच्या. त्यातून पण त्यांनी हाताने लिहून दिलेले राहायचं ज्यात चूक पण होऊ शकते. वेळेवर कागद कधीच मिळायचा नाही. परंतु आता या internet च्या जगात सर्वकाही घरबसल्या मिळू शकते तर आपला 7/12 च का नाही मिळणार. यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या महाभूमिलेख किंवा https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecordsथेट या लिंक वर जाऊन भेट द्या.
- त्यानंतर तुम्हाला त्या mahabhumilekh 7/12 पानावर ragistration करावे लागेल ते तुम्ही तुमचा मोबाईल न वापरून करू शकता.
- त्यात तुम्ही तुमचा मोबाईल न, E-mail ID, आधार न, पत्ता , जन्म तारीख , जिल्हा व तालुका येवढं निवडा.
- शेवटी तुम्हाला तुमचा मजबूत संकेतांक शब्द तयार करायचा आहे.
- तुमची online 7 12 utara पाहण्यासाठीची रजिस्टर प्रोसेस पूर्ण झाली.
- तुमच्या आयडी आणि पासवर्ड च्या माध्यमातून लॉग इन करा.
- त्यानंतर तिथे तुम्हाला ७/१२ पाहण्यासाठी जिल्हा निवडा , तालुका , आणि गाव निवडा अचूक रित्या निवडा .
- शेवटी तुम्हाला पाहायचा असलेला online ७/१२ चा सर्वे न टाका नंतर सर्च बटन दाबा तुमच्या समोर digital online 7/12 असेल.
तर अशा पद्धतीने वरील काही अगदी थोडक्यात स्टेप्स तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमच्या शेतीचा सातबारा हा अगदी बसल्या ठिकाणी मिळवू शकता. तसेच आता महाराष्ट्र सरकारने सातबारा वरती लावण्यात येणारी वार्षिक पिके किंवा रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम मध्ये येणारी पिके यांचा देखील नोंद तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकता. सुरुवातीच्या काळामध्ये सातबारा वरती पीक नोंदणी ही देखील ऑनलाइन प्रोसेस होती म्हणजेच कागदपत्रे लिहून तलाठ्याकडून घ्यावे लागायचे की माझ्या शेतामध्ये हे पीक आहे त्यानंतर तलाठी ते पीक पाहण्यासाठी आपल्या शेतामध्ये यायचा आणि नंतर आपल्या सातबारावरती त्या वर्षासाठी त्या पिकाची नोंद लावायचा.
परंतु आता ईपीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये दिलेल्या काही माहिती अचूक रित्या भरून अगदी शेवटी तुमच्या शेतातील लोकेशनवर जाऊन तुमच्या पिकाचा फोटो काढून अपलोड करू शकता आणि अगदी काही तासांमध्ये तुमच्या पिकाची नोंद ही सातबारा वरती दिसून जाईल.