---Advertisement---

अशी करा मॉडर्न शेती

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
अशी करा मॉडर्न शेती
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

तर नमस्कार मित्रांनो आजची युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड असलेले युग म्हणून ओळखले जाते. यामध्ये तंत्रज्ञान आणि शेती या दोन्ही भागांमध्ये खूप सारे बदल घडून आले आहेत. तंत्रज्ञानामुळे आजच्या युगातला शेतकरी खूप सुखी झालेला आहे. असे जरी झाले असले तरी शेतकरी कर्जबाजारी अजूनही आहेच. त्याचा निघालेला उत्पन्नातून त्याचा जेमतेम खर्च तर कधी तोटा होतो. यामागचे अनेक कारणे आहेत. त्यातील काही प्रमुख कारणे सांगायची झाली तर, विकसित शेती न करता पारंपारिक शेती करणे, तंत्रज्ञानाचा वापर न करणे, वातावरणाचा अभ्यास न करता शेती करणे अशा प्रकारची काही प्रमुख कारणे तुम्हाला शेतीमध्ये तोटा होण्यास कारणीभूत ठरतात.

शेतकऱ्याला शेती करताना आपण काय पिकवतोय, त्याला बाजारपेठ मध्ये भाव काय आहे, आपला शेतमाल बाजारामध्ये जाईपर्यंत त्याला योग्य भाव मिळेल का आणि सर्वात महत्त्वाचं कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे निघेल याचा जर का तंतोतंत आणि काटेकोरपणे नियोजन केल्यास शेतीमधून येणारे उत्पन्न नक्कीच शेतकऱ्याला भरभरून नफा मिळवून देईल.

मॉडर्न शेतीसोबत जोडधंदा करा :

आपण फक्त शेती एके शेती करून जास्त नफा मिळवू शकत नाही. किंवा कधी कधी नैसर्गिक वातावरण साथ देत नाही त्यामुळे देखील तुम्ही कष्ट करून देखील तुम्हाला हवा तेवढा नफा शेतीमधून भेटत नाही. तर यासाठी पर्याय म्हणून तुम्ही मॉडर्न शेतीसोबत काहीही एक जोडधंदा करू शकतात. यामुळे होईल काय की शेतीमधून तुम्हाला निराशा आल्यास त्या जोडधंदाच्या आधारे तुम्ही तुमचं कुटुंब चालवू शकता. म्हणजेच तुमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही. तर खाली काही शेतीसोबत करता येणारे जोडधंदे पाहूया,

  1. कोंबडी पालन :

शेतकरी आपली पारंपरिक शेती करत करत कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्म हा एक शेतीला जोडधंदा असणारा व्यवसाय करू शकतो. आता यामध्ये सांगायचं झालं तर बॉयलर कुक्कुटपालन, कडकनाथ कुकूटपालन अशा प्रकारचे कुक्कुटपालनाचे व्यवसाय येतात. कुक्कुटपालना मार्फत शेतकरी अंडे आणि मांस यामधून चांगलाच नफा कमवू शकतात. यासाठी लागणारे भांडवल सांगायचं झालं तर मोकळी जागा आणि त्यांना लागणारा चारा, पाणी या महत्त्वाच्या गोष्टींच्या आधारे तुम्ही अगदी सहजरित्या हा व्यवसाय करू शकता.

2. फळबाग लागवड :

    आपण आजूबाजूला पाहतो शेतकरी शेतामध्ये काही वार्षिक पिके घेतो तर काही हंगामी पिके घेतो. तरी या दोन्ही पिकांमध्ये बाजारभाव मिळण्याची शक्यता आणि नैसर्गिक वातावरणाच्या बदलामुळे उत्पन्न आणि बाजार भाव या दोन्ही गोष्टी व्यवस्थित ठरल्या तरच शेतकऱ्याला नफा मिळतो नाहीतर केलेली सगळी मेहनत मातीमोल ठरते. हंगामी पिके केल्याने त्या त्या हंगामामध्येच त्या पिकाला मिळणारा भाव यावर नफा ठरतो. जर शेतकऱ्याने सिताफळ, पेरू, आंबा अशा प्रकारचे फळबागा थोड्याशा प्रमाणामध्ये शेतामध्ये ठेवल्या आणि वाढवल्या तर यातून येणारा नफा हा शेतकऱ्याला चांगलाच फायद्याचा ठरू शकतो. आणि तसेच या पिकांना पाणी देखील कमी लागते आणि जास्त रोगही येत नाहीत.

    3. भाजीपाला :

    हंगामी पिकांसोबत जर आपल्या क्षेत्रफळाचं समांतर भागांमध्ये विभाजन करत हंगामी पिके काही ठराविक भागांमध्ये फळबागा काही ठराव भागामध्ये आणि त्याबरोबरच जर का दोन ते तीन प्रकारचा भाजीपाला टप्प्याटप्प्याने पिकवला तर एखाद्या का होईना भाजीपाल्याला नक्कीच बाजार भाव भेटेल. यामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही टोमॅटो, मिरची, मेथी अशा प्रकारच्या पालक भाज्या आणि फळभाज्या पिकवून त्यातून चांगला नफा कमवू शकता.

    शेती करताना तंत्रज्ञानाचा वापर करा :

    तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंतची परंपरागत शेती करताना उत्पन्न कमी निघायचे आणि त्यासाठी ते पीक पिकवण्यासाठी वेळही खूप जास्त लागायचं. परंतु आत्ताच्या आधुनिक काळामध्ये शेतीपूरक यंत्रणांचा वापर करून अगदी कमी वेळामध्ये जास्त कामे करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे. आधुनिक अवजारांचा वापर करणे आधुनिक यंत्रणांचा वापर करणे तन नाशक कीटकनाशक न्यूट्रिएंट्स अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले पीक उत्कृष्ट दर्जाचे पिकवता येते. ती उत्कृष्ट दर्जाचे पिकवल्यास त्याला बाजार भाव हि तशा प्रकारचा भेटतो.

    जर का शेतकऱ्याकडे बागायती क्षेत्र असेल म्हणजेच मुबलक पाणी असेल तर शेतकरी केळी फळबाग किंवा द्राक्ष किंवा डाळिंब अशा प्रकारच्या फळबागा लागवड करून त्यांचा जर का तंतोतंत आणि काटेकोरपणे नियोजन केल्यास चांगले उत्पन्न मिळवत अतिशय चांगल्या प्रकारचा नफा मिळवता येऊ शकतो. त्यासाठी लागणारे क्षेत्रफळ पाणी बाजार भाव मनुष्यबळ यंत्रणा योग्य पाण्याचे नियोजन आणि वातावरण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून फळबागा चांगल्या प्रकारे फुलवता येतात.

    तर अशाप्रकारे वरील दिलेल्या काही टिप्सच्या माध्यमातून शेतकरी मित्र नफ्यामध्ये राहू शकतो. कर्जबाजारी होण्यापासून दूर राहू शकतो.

    ---Advertisement---

    Leave a Comment