---Advertisement---

अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात १९९० पासून गाजतय. शरद पवार यांच्यावर केंद्राची जबाबदारी आल्यावर अजित पवारांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा सांभाळली आणि पक्षविस्तार केला. हेच एक मुख्य कारण असू शकते की ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस मधे फूट पडली तेव्हा शरद पवारांपेक्षा अजित पवारांच्या सोबत जास्त आमदार उभे राहिले. दादांनी सहाव्यांदा उपुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने याबाबतीत एक नवीन विक्रम तयार झालं आहे . तसेच दादांना Eternal deputy CM अस ओळखल जातय. अजित पवारांनी १९९० या वर्षी त्यांच्या राजकीय करकिरतिची सुरुवात केली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत दादा राज्याच्या राजकारणात एकदम टिकून राहीले आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय करकित्तीची माहिती आपण या आर्टिकल च्या माध्यमातून पाहूया,

अजित पवारांची राजकारण सुरुवात:

अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केला तो काका शरद पवार यांच्यामुळे पण त्यांची एक खासियत म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत शरद पवारांना कधीच कॉपी केलं नाही. त्यांनी नेहमी स्वतःला वेगळं ठेवलं.अजित पवारांचं राजकीय कारकीर्द हि जरी १९९० पासून सुरू झाली असली तरी त्यांनी राजकारणात १९८२ पासूनच पाऊल ठेवलं होतं. त्याच राजकारण हे साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मधे फिरत होत. याचमुळे दादांना अगदी मुळापासून पाया मजबूत करता आला . गावपातळीवर असलेल्या लहान मोठ्या निवडणुका यामुळे दादांना सर्वसामान्यांमधे मिसळता आल. त्यातून त्यांचा जनसंपर्क वाढला. याचा फायदा त्यांना आत्तापर्यंतच्या राजकारणात झाला

अजित पवारांचा पाहिला विजय:

अजित पवारांनी १९९१ मधे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक बारामती या मतदार संघातून लढवली आणि पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. पण त्यांची खासदारकी हि जास्त काळ टिकली नाही . शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित दादांनी हि राजीनामा दिला. त्या वेळी त्यांची बारामतीची पोटनिवडणूक लढवली होती आणि तेव्हा ते ८६,९१५ मतांनी निवडून आले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अजित दादांनी सलग ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे दादाचा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच दबदबा निर्माण झाला.

१९९१ ल शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुधाकर राव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात अजित दादांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिपद देण्यात आल. कृषी , फलोत्पादन आणि ऊर्जा मंत्री म्हणून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली.९० चे दशक अजित दादांसाठी खूप महत्त्वाचं ठरलं कारण या काळामध्ये दादांनी पुणे शहर आणि ग्रामीण भागात आपला चांगलाच जम बसविला. त्यात मग गावपातळीवर असलेल्या निवडणुका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा खासदारकी इथपर्यंत सर्व त्यांनी आपल्या कंट्रोल मधे ठेवलं

अजित पवारांचा पुण्याच्या राजकारणात प्रवेश :

त्यावेळी पुण्याच्या राजकारणात टोपिवाल्या राजकारण्यांची संख्या जास्त होती . मग अजित पवारांनी हळू हळू तरुणांना राजकारणात उतरवायला सुरुवात केली आणि काँग्रेस मधेच स्वतःचा एक गट तयार केला. याचा फायदा जेव्हा शरद पवारांनी काँग्रेस ल सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा पुणे जिल्ह्यात याचा खूप फायदा झाला. त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस सोबत मैत्री करून १९९९ साली सरकार स्थापन केलं. त्यात काँग्रेस चे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री तर छगन भुजबळ हे उपुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख यांच्या मंतरिमंडळात अजित दादांना पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री पद देण्यात आल. पुढे पाटबंधारे मंत्रिपद हेच जलसंपदा मंत्रिपद म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

सिंचन घोटाळा प्रकरण :

२००४ च्या निवडणुकीत राषट्रवादीने ७१ तर काँग्रेस ने ६९ जागा मिळाल्या होत्या. तर या आकडेवारीवरून राष्ट्रवादीचं एनडीए च मुख्यमंत्री पद पक्क मानल जात होते. परंतु शरद पवारांनी मुख्य मंत्री पदांच्या बदल्यात मुख्यमंत्री पदाची खंदेबदली केली. याबाबत अजित पवारांनी बऱ्याच ठिकाणी खंत देखील व्यक्त केली . विलासराव देशमुख यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात पुन्हा दादांना जलसंपदा मंत्रिपद मिळाले. तसेच २०१० साली आदर्श घोटाळ्यात सापडलेल्या अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर त्यांच्याबदल्यात गांधी घराण्याच्या अगदी जवळ असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवारांना उपुख्यमंत्री करण्यात आल. त्याचबरोबर त्यांना अर्थ खातहि देण्यात आल.

पण २०१२ हे वर्ष अजित पवारांनासाठी खूप धोक्याच ठरल. त्या वेळी त्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला . सिंचन प्रकल्पासाठी ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात ०.०१ % सिंचन क्षेत्रात सुधारणा झाल्याचे सरकारच्याच economic survey मधे नोंदवण्यात आल होत. १९९९ ते २०१२ पर्यंत अजित पवार हेच जलसंपदा मंत्री होते यामुळे साहजिकच सिंचन घोटाळा केल्याचा आरोप अजित पावरांवरच करण्यात आला.

यानंतर त्यांनी २६ सप्टेंबर २०१२ रोजी अचानक पत्रकार परिषद बोलावली आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली. आणि या घोटाळ्याची निष्पक्ष पडताळणी व्हावी अशी मागणी केली.त्यानंतर ३ महिन्यानंतर म्हणजेच ७ डिसेंबर २०१२ ला पुन्हा एकदा अजित पवारांनी उपुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ हे वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी साठी फार घटक थरल. यावर्षी केंद्रात नरेंद्र मोदी ची लाट आली होती त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात ही झालं आणि राज्यात सेना भाजप च सरकार आलं. १९९५ ते १९९९ नंतर २०१४ ते २०१९ पर्यंत अजित पवारांना सत्तेबाहेर राहावं लागलं होतं.

नंतर २०१९ ला पुन्हा एकदा महविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. परंतु त्या आधी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ३ र्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.परंतु हा शपथ विधीचा प्लॅन ७२ तासातच फसला. आणि त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. नंतर उद्धव ठाकरें मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा अजित पवारांनी ४ थ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

शरद पवारांसोबत बंडखोरी:

परंतु एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं आणि ठाकरे यांनी राजीनामा दिला. जुन २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत अजित दादांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज पाहिलं. २३ जुलै २०२३ ला आपल्या काकांसोबत बंड केलं आणि ४१ आमदारांसह भाजप सोबत युती केली आणि ५ व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यामध्ये भाजप शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी महायुती सरकार स्थापन केलं. २०२४ लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना फक्त ४ जागा मिळाल्या यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वावर बोट करण्यात आल.

स्वतःच अस्तित्व निर्माण:

लोकसभेच्या पराभवानंतर अजित दादांनी नवं रूप धारण केलं आणि अर्थ मंत्री पद असल्यानं लाडकी बहिण योजना चालू केली आणि प्रचार जोरात केला. यामुळे अजित पवारांना ५९ पैकी ४१ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. आणि भाजप शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी राज्यात सरकार स्थापन केलं आणि दादांनी ६ व्यंदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याचबरोबर त्यांनी आपणच महाराष्ट्राच्या राजकारणात दाद असल्याचे सिद्ध करून दाखवले.

अजित पवार यांचं परिवार आई पत्नी सुनेत्रा पवार आणि दोन मुले.

तर अशा प्रकारचा आत्ताची महाराष्ट्राचे सहाव्याद्द होणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा राजकीय प्रवास आहे. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या काका चूलते शरदचंद्र पवार यांच्या छत्रछायेखाली आपल्या राजकारणाचे इतके वर्ष घालवले होते परंतु इथून पुढचा प्रवास हा ते स्वतः वैयक्तिक त्यांच्या निर्णयावर त्यांचा राजकीय प्रवास चालणार आहे. त्यामुळे हेही पाहण्यासारखे आहे की त्यांना राजकारणामध्ये काकांच्या मदतीशिवाय स्वतःचा अस्तित्व टिकवता येतं का?. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार याला देखील 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते परंतु त्यांना विजय होता आले नाही. आता अजित पवार यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा कोण चालवणार हे देखील येणारी वेळ सांगेल.

---Advertisement---

Leave a Comment